
भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात आरबीआयची खरेदी 20 महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर गेली. तर गेल्या दोन महिन्यांत आरबीआयने सोने खरेदी करणे टाळले आहे.






सोन्याच्या किंमती वाढण्यात मध्यवर्ती बँकांकडून खरेदीचा मोठा वाटा आहे. सोन्याच्या भावात सध्या विक्रमी वाढ होत आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याने 66 हजार रुपयांची पातळी ओलांडली आहे. आंतरराष्ट्रीय किंमती 2,200 डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर आहे.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी 2024 मध्ये जगभरातील केंद्रीय बँकांकडून 39 टन सोन्याची निव्वळ खरेदी करण्यात आली. मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या गुंतवणुकीत वाढ झालेला हा सलग 8वा महिना आहे. जगभरातील केंद्रीय बँकांनी डिसेंबर 2023 मध्ये एकूण 17 टन सोने खरेदी केले होते.
खरेदीच्या बाबतीत कोणता देश पुढे आहे?
अहवालानुसार, जानेवारी 2024 मध्ये सर्वाधिक खरेदी सेंट्रल बँक ऑफ तुर्कीने (CBRT) केली होती. तुर्कस्तानच्या सेंट्रल बँकेने या काळात सोन्याचा साठा 12 टनांनी वाढवला. जानेवारी 2024 ऑक्टोबरच्या अखेरीस तुर्कीचा सोन्याचा साठा 552 टनांपर्यंत वाढला. फेब्रुवारी 2023 मध्ये तुर्कीचा सोन्याचा साठा 587 टन इतका विक्रमी उच्चांकावर होता.










