अजितदादांकडून ‘ही’ कार्यकर्त्यांना शपथ “सार्वजनिक जीवनात..” ‘रयतेचं राज्य’ची प्रेरणा मुंडेना नवी मोहीम

0

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाच्या युवक कार्यकर्त्यांचा ‘युवा मिशन 2024’ हा मेळावा पुण्यात रविवारी (11फेब्रुवारी) पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 12 ते 19 फेब्रुवारी या ‘स्वराज्य सप्ताहा’निमित्त कार्यकर्त्यांना शपथ दिली आहे. तसेच, आम्ही वचनपूर्तीचं कार्य करणारे आहोत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काहीतरी बोलायचं आणि करायचं वेगळं ही आपली भूमिका नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.

अजित पवार म्हणाले, “12 ते 19 फेब्रुवारी हा स्वराज्य सप्ताह म्हणून साजरा करायचं पक्षानं ठरवलं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करणार आहोत. साडेतीनशेव्या शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. शिवरायांनी त्यांच्या कार्यातून महाराष्ट्राला स्वाभिमान, आत्मभान, ओळख, अस्मिता, लढाऊबाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली.”

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

“राष्ट्रवादीनं कायमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘रयतेचं राज्य’ या संकल्पनेपासून प्रेरणा घेतलेली आहे. युवा वर्गाची ताकद आणि शक्ती ही आपल्या पक्षाची प्रेरणा आहे. युवा वर्ग हा पक्षाचा कडा आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं.

याच मेळाव्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा प्रचार प्रमुखपदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा सुनील तटकरे यांनी केली. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक नेते आणि मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

यावेळी ‘स्वराज्य सप्ताहा’निमित्त अजित पवारांनी कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना शपथ दिली आहे. अजित पवार म्हणाले, “येणाऱ्या ‘स्वराज्य सप्ताहा’निमित्त जबाबदार नागरिक या नात्यानं शपथ घेतो की, मी सार्वजनिक जीवनात सर्व कायद्याचे पालन करेन. मी महिला आणि मातृशक्तीचा कायम आदर करेन. दरवर्षी मी एक झाड लावण्याचा आणि ते वाढवण्याचा संकल्प करीत आहे. मी माझ्या परिसरातील काळजी घेईन. मी स्वत: व्यसनापासून दूर राहिल. तसेच, व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन.”

“सार्वजनिक जीवनात धर्म, जात, पंथ, लिंग या आधारावर कुठल्याही प्रकाराचा भेदभाव करणार नाही. समाजात सार्वजनिक सद्भाव आणि सलोखा कायम राखण्याचा प्रयत्न करेन,” अशी शपथ अजित पवारांनी दिली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार