ज्या साध्या साध्या गोष्टी सामान्य शेतकऱ्याला समजतात, त्या सुशिक्षित लोकांना का समजत नाहीत’ असा सवाल उपस्थित करून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. यावेळी भाजपच्या हिंदुत्वावर पुन्हा टीका करत त्यांनी घराणेशाही आणि एकाधिकारशाहीवरूनही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.






लोकांना सगळं समजतं
‘भारतरत्न पुरस्कार हे निवडणुकीच्या तोंडावर देत भाजपला जर वाटत असेल की, त्यामुळे त्या त्या प्रदेशातील लोकांवर त्याचा परिणाम होतो. मात्र आता लोकांना सगळ्या गोष्टी समजतात’ असं सांगत त्यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली.
लोकं विश्वास ठेवणार नाही;
यावेळी ‘त्यांनी भाजप निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी केलेल्या अनेक गोष्टींवर आता लोकं विश्वास ठेवणार नाहीत असाही टोला त्यांनी भाजपला लगावला.’
पक्ष संपवण्याचं काम
उद्धव ठाकरेंनी टीका करताना ‘भाजप नेत्यांवर, पक्षांवर अनेक प्रकारच्या कारवाय करून संपवण्याचं जे काम चालू केलं आहे. ते भयंकर आहे. मात्र जनसामान्यांच्या मनात तुमच्याविषयी काय भावना आहे ती मतं तुम्ही सामान्य शेतकऱ्यांकडून जाणा’ असंही त्यांनी सांगितलं.
शेतकऱ्यांची भावना काय?
‘आजच्या काळातील शेतकरी तुम्हाला मतदान देण्यापेक्षा मी कुटुंबासह आत्महत्या करीन म्हणतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या’ अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
एकाधिकारशाहीलाही विरोध
‘भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घराणेशाहीवर टीका केली जाते मात्र आम्हीही घराणेशाहीला विरोध करतो. त्याचप्रमाणे आमचा तुमच्या एकाधिकारशाहीलाही विरोध’ असल्याचा घणाघात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला.











