पाकिस्तानी हनी ट्रॅप प्रकरणी हसीना होती कुरुलकरची ‘ड्रीम गर्ल’ ; ३ ई-मेल ने दिली माहिती

0

पुणे : पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी बेबीच्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकला होता. पाकिस्तानी हसीनाने त्याच्याकडून अनेक माहिती काढून घेतली. मे महिन्यात उघड झालेल्या या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाने केला. विशेष तपास पथकाने दोन महिने चौकशी केली. त्यानंतर प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात भक्कम पुरावा जमा केला. आता पुणे जिल्हा न्यायालयात सुमारे दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्या आरोपपत्रात अनेक गोष्टींचा उल्लेख आहे.

कुरुलकर म्हणत होता ड्रीम गर्ल

पाकिस्तानी हसीनाला प्रदीप कुरुलकर ड्रीम गर्ल म्हणत होता. त्यासंदर्भात खुलासा चार्जशीटमध्ये केला आहे. पाकिस्तानी महिलेला तीन ई-मेलच्या माध्यमातून प्रदीप कुरुलकर याने माहिती दिली. dreamgirl56@gmail.com। या मेल आयडीचा पासवर्ड पाकिस्तानी गुप्तहेर झाला दासगुप्ता आणि प्रदीप कुरुलकर या दोघांकडे होता. त्याने तिच्याशी शारीरीक संबंध निर्माण करण्यासाठी ही माहिती दिली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कोणत्या माध्यमातून दिली माहिती
पाकिस्तानी हसीनाशी संपर्क साधण्यासाठी प्रदीप कुरुलकर वेगवेगळे सोशल मीडिया ॲप्लिकेशनचा तो वापर करत होता. डीआरडीओचा तेव्हा संचालक असलेला प्रदीप कुरुलकर आणि पाकिस्तानी हसीना झारा दासगुप्ता यांचा संपर्क व्हॉट्सॲपने होत होता. तसेच सोशल मीडियावरील वेगवेगळे ॲप्सचा वापर ते करत होते. बिग चँट, क्लाऊड चँटवरून दोघे संवाद करत असल्याची माहिती पुणे न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून उघड झाली आहे. पहिल्या चँटमध्ये झाराला सरफेस टू एअर मिसाईलबदल माहिती दिल्याचं झालं उघड झाले आहे.

काय काय माहिती दिली
कुरुलकर याने अनेक महत्वाची माहिती झारा दासगुप्ता हिच्यासोबत शेअर केली. त्यात संरक्षण प्रकल्पात वापरण्यात येणाऱ्या साहित्याची रचना, गुजरातमधील संरक्षण कार्यक्रमात दाखवण्यात आलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, आकाश लाँचरची माहिती होती. तसेच नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये काय आहे ही माहितीसुद्धा त्याने दिली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

झारा दासगुप्ताचे आणखी एक नाव

पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ता या नावाने प्रदीप कुरुलकर याच्याशी संपर्क करीत होती. आता या पाकिस्तानी गुप्तहेरने स्वतःचे नाव जुही अरोरा ठेवल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे. कुरुलकर याचे संबंध अनेक महिलांसोबत होते. तो डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक महिलांना बोलवत होता. यासंदर्भातील जबाब दोन महिलांनीही दिला आहे.

पाकिस्तानी गुप्तहेराने आधी प्रदीप कुरुलकर याच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲपवर HI… पाठवले अन् दुसरेच नाव लिहिले. मग प्रदीप कुरुलकर याने स्वत:चा परिचय देत उत्तर दिला. आपण डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ असल्याचे त्याने म्हटले. यानंतर पाकिस्तानी गुप्तहेरने आपले नाव झारा दासगुप्ता सांगितले आणि आपण भारतीय असून इंग्लंडमध्ये राहत असल्याचे सांगितले. मग त्यानंतर त्यांचे संभाषण सुरु झाले. ऑडिया कॉलनंतर व्हिडिओ कॉल सुरु झाले. त्यात ती न्यूडसुद्धा झाली.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

प्रदीप कुरुलकर याच्याकडे दोन पासपोर्टही सापडले आहे. शासकीय पासपोर्ट वापरुन पाच ते सहा देशांचा दौरा केला आहे. त्यामुळे विदेशात तो कोणाला भेटला आणि त्याने काय माहिती दिली? हे ही तपास समोर आले आहे का? हे स्पष्ट झाले नाही.