समान नागरी कायदा होणार लागू? मोदी सराकरला मिळालं AAP चे मोठं समर्थन!

0

समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याबाबत सध्या देशात वाद पेटला आहे. यामुद्द्यावर मोदी सरकारने आम आदमी पक्षाकडून मोठं समर्थन मिळालं आहे. AAP चे संघटन महासचिव संदीप पाठक यांनी ‘आज तक’ यावृत्तवाहिनीशी बोलताना आम आदमी पार्टी समान नागरी कायद्याचे तत्वतः समर्थन करते अशी माहिती दिली आहे. संदीप पाठक यांनी सांगितले की, आर्टिकल ४४ मध्ये देखील समान नागरी कायदा असावा असं सांगितलं आहे, मात्र आपचे म्हणणे आहे की, या मुद्द्यावर सर्व धर्म आणि राजकिय पक्षांमध्ये चर्चा झाली पाहिजे. तसेच सर्वांच्या सहमतीनेच हा कायदा लागू केला जाावा.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

त्यांनी समान नागरी कायदा लागू करण्याच्या मुद्द्यावर भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका देखील केली आहे. ते म्हणाले की भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे की जेव्हा निवडणूका येतात तेव्हाच ते गुंतागुंतीचे आणि अवघड मुद्दे समोर घेऊन येतात.

पाठक पुढे बोलताना म्हणाले की, भाजपचा यूसीसी लागू करणे आणि हा प्रश्न निकाली काडण्याशी काहीही संबंध नाहीये. भाजप फक्त स्टेट ऑफ कन्फ्यूजन तयार करते. जेणेकरून देशात फूट पाडता येईल आणि निवडणूका जिंकता येतील. पंतप्रधान मोदींनी मागचे ९ वर्ष काम केलं असतं तर त्यांना कामाचा आधार असता, पण पंतप्रधानांना कामाचा आधार नाहीये, म्हणून ते UCC चा आधार घेत आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

समान नागरी कायदा काय आहे?

समान नागरी कायद्याअंतर्गत सर्व धर्मांसाठी एकच कायदा व्यवस्था असणार आहे. सध्या प्रत्येक धर्माचा पर्सनल लॉ आहे, ज्याअंतर्गत लग्न, घटस्फोट आणि संपत्तीसंबंधी वेगवेगळे कायदे आहेत. समान नागरी कायदा लागू केल्यास सर्व धर्म पाळणाऱ्या नागरिकांची प्रकरणे सिव्हील नियमांतर्गत सोडवले जातील. समान नागरी कायदा लागू केल्यास लग्न, घटस्फोट, दत्तक घेणे, उत्तराधिकारी आणि संपत्तीचा अधिकार यासंबंधिच्या कायदे सर्वांसाठी एकच असणार आहेत.