शिंदे सेनेचा दिल्लीतही विस्तार; थेट सत्ताधारी आमदार आप नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

0

सत्तातरांच्या अकरा महिन्यात उद्धव ठाकरे गटाने खूप काही गमावले आहे. आधी आमदार, नंतर खासदार, महाराष्ट्राची सत्ता आणि त्यानंतर आता सभागृहातली कार्यालयं सुद्ध शिंदेंच्या शिवसेनेनं घेतली आहेत. सर्वात आधी ठाकरे गटानं 40 आमदार गमावले. त्यानंतर 13 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंना मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सर्वत्र दौरै सुरु केले. पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला. आता त्यांनी आपल्या पक्षाचा दिल्लीत विस्तार सुरु केला आहे.

आतापर्यंत ठाकरे गटातील अनेक लोकप्रतिनिधींनी शिंदे गटात प्रवेश केलाय. राज्यभरातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. एकनाथ शिंदे यांचं हे धक्कातंत्र कायम ठेवला आहे. उद्धव ठाकरे गटच नाही तर इतर पक्षामधून शिवसेनेत कार्यकर्ते येत आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

आप नेता शिंदे सेनेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष विस्ताराचा प्रयत्न दिल्लीतही सुरु झाला आहे. आप नेते आणि माजी आमदार कर्नल देवेंद्र सहरावत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजधानी दिल्लीत पक्षसंघटनाचा विस्तार करण्यासाठी, दिल्लीतील परिवहन कर्मचाऱ्यांसाठी, ऑटो चालक तसेच सफाई कर्मचाऱ्यांना जोडण्याचा शिवसेनेचा सहरावत यांच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. दिल्ली ऑटो रिक्षा संघटनेचा शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील असंघटीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना लक्ष केंद्रीत करणार आहे. सहरावत यांच्या शिवसेना प्रवेशाच्या कार्यक्रमात माजी खासदार आनंदराव अडसूळ ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

शिवसेना मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी संभाव्य कार्यकारिणी जाहीर केली होती. त्यात मुख्य नेते एकनाथ शिंदे, तर नेतेपदी संजय शिरसाठ, संदीपान भुमरे, सदा सरवणकर, राहुल शेवाळे आणि शंभुराज देसाई आदींचा समावेश होता. या सर्वांकडून शिवसेनाचा विस्तार करण्याचे काम सुरु आहे. ठाकरे गटाला राज्यात नाही तर देशात जेथे त्यांचे कार्यकर्ते आहे, त्याठिकाणी पर्याय देण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न दिसत आहे.