गौतमी पाटील हा विषय सध्या चांगलाच तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून गौतमीच्या आडनावावरुन वाद सुरू आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे असे म्हटले जात आहे.मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी गौतमीला तिचे पाटील आडनाव बदलण्याचा इशारा दिला आहे. तसेच ती तिच्या नावापुढे पाटील लावून पाटलांची बदनामी करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावर आता गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गौतमीला पाटील आडनाव काढण्यास सांगणाऱ्यांना गौतमीच्या वडीलांनी ठणकावून सांगितलं. तिचं आडनाव पाटीलच आहे, तर ते पाटील आडनाव कसं काढणार? गौतमीप्रमाणेच अनेक कलाकार त्यांची कला सादर करतात आणि त्यांनी त्यांचं आडनाव काढावं म्हणून कोणी का बोलत नाही? असं म्हणत टीका करणाऱ्यांना गौतमीचे वडील रवींद्र पाटील यांनी उत्तर दिलं आहे. आणि आपण कायम गौतमीच्या कायम पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.











