४ वर्षात ९ आमदार-खासदारांचा कार्यकाळापूर्वी अकाली निधन; ‘ही’ आहेत कारणे

अकाली निधनाचे वेगवेगळी कारण जीवनशैलीशी संबंधित आजार देखील याला कारणीभूत ठरत आहे.

0

लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर यांचं निधन झालं. दिल्ली इथल्या मेदांता रुग्णालयात वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र एवढ्या कमी वयात त्यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. पण 2019 च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांत निवडून आलेल्या आतापर्यंत नऊ आमदार-खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच निधन झालं आहे. या सर्वांचे वेगवेगळे कारणे आहेत. विशेष म्हणजे त्यांची वयंही काही फारशी नव्हती. पण त्यांच्या अकाली निधनाचे वेगवेगळी कारणे असून, त्यांची जीवनशैली, त्याच्याशी संबंधित आजार देखील याला कारणीभूत ठरत आहे.

2019 पासून आतापर्यंत 9 आमदार-खासदारांचं निधन…

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले

राष्ट्रवादी पक्षाचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे 60 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले.

देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे 63 वर्षी कोरोनाने मुंबईत निधन झाले.

कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे वयाच्या 57 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मुंबई अंधेरी ईस्टचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे 52 व्या वर्षी दुबईत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या 57 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचीही कर्करोगाशी झुंज अपयशी ठरला आणि अखेर 60 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

काँग्रेस हिंगोलीचे तरुण खासदार राजीव सातव यांचा कोरोनामुळे वयाच्या 47 व्या वर्षी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे 73 वय वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.

तर पित्ताशय आणि स्वादुपिंडामध्ये इन्फेक्शन झाल्याने काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे 47 व्या वर्षी निधन

नेत्यांच्या अकाली निधनाचे कारणे…

अवेळी झोप, झोप पूर्ण न होणे

सकाळपासून लोकांचा गराडा रात्री उशिरापर्यंत असतो, यामुळे शुगर, बीपी सारखे कमी वयात जडतात.

अधिक वाचा  जनशक्ती पुढे महाशक्ती पराभूत! जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होणार, नैतिकता अखेर जागृत व्यवहारातून बाहेर पडण्याचा विशाल गोखलेंचा निर्णय

अवेळी जेवण, कार्यकर्त्यांच्या गराड्यात वेळच्या वेळी जेवण मिळत नाही.

सततचे धकाधकीचे जीवन यामुळे वेगवेगळे आजार जडतात.

सततचे रात्री-बेरात्री दौरे करणे

व्यायामाला वेळ मिळत नसल्याने शरीर निरोगी राहत नाही, त्यामुळे देखील अनेक आजारांना आमंत्रण मिळते.