इथेनॉलच्या उत्पादनाबाबत मोठी अपडेट! प्लान्ट लावण्यास ही मदत: अजित पवारांची माहिती

0

पुणे : इथेनॉल उत्पादनाबाबत मोठी अपडेट आली आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात झालेल्या बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण महिती दिली आहे. अजित पवार म्हणाले की, बैठकीत अमित शहांनी सांगितलं की, कारखान्यांना इथेनॉलचे प्लान्ट लावण्यासाठी मदत करायची आहे. तुमचे काही प्रस्ताव असतील तर ते पाठवून द्या. तसेच जे कारखाने अडचणीत आहेत, त्यांना एमसीडीसी मदत करण्यास तयार आहे. परंतु, कागदपत्रांची पूर्तता संचालक मंडळाने किंवा प्रशासकाने केली पाहिजे, असं अमित शहांनी सांगितल्याचं, अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, मध्यंतरी मी शिरूर येथे एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे घोडगंगा काऱखान्याबाबत अडचणी होत्या. त्याबद्दल मी, दिलीप वळसे पाटील आणि साखर आयुक्त यांच्यासह इतर काही सहकाऱ्यांनी बैठक घेतली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

राहुल गांधी यांना दिलासा मिळाला, त्याबद्दल अजित पवार म्हणाले की, तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय़ आहे. न्याय व्यवस्थेने न्याय दिलेला आहे. गृहमंत्री अमित शहांनी कौतुक केल्याच्या प्रश्नावर अजित पवारांनी पत्रकारांना प्रतिप्रश्न केला. तुम्हाला काय त्रास झाला? यांनी कौतुक केलं, त्यांनी टीका केली, तुम्हाला काय वाटतं, अरे, आम्हाला काय करायचं, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार पुढं म्हणाले, आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करणारे माणसं आहोत. राज्याचा विकास करण्याकरिता, समस्या सोडवण्याकरता, लोकप्रतिनिधींची कामे होण्याकरिता, मी निर्णय घेतला. मला तरी नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता दिसत नाही. काही जण माझ्यावर टीका करतात. माणसाच्या अनुभवातून वेगवेगळी मतं होऊ शकतात. परवा पंतप्रधानांनी ५०० रेल्वे स्टेशनसाठी २५ हजार कोटींची तरतूद केली. पहिल्या टप्प्यात १२६ रेल्वेस्टेशन घेतले. त्यात महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानक आहेत, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा