दारूविक्रीने राज्य सरकारची तिजोरी फुल्ल; 25% महसुल वाढ; विक्रमी 21,550 कोटीचा फायदा

0

महाराष्ट्र शासनाने दारू विकून घसघशीत कमाई केली आहे. दारूच्या विक्रीत एका वर्षात 23% विक्रमी वाढ झाली असून महसुलात 25% वाढ झालीय. उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात 2021-22 आणि 2022-23 या कालावधीत दारूच्या विक्रीत 23% वाढ झाली आहे. किमतीत वाढ होऊनही गेल्या अनेक वर्षात ही सर्वात मोठी वार्षिक वाढ असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्याला विक्रमी रु. 21,550 कोटी उत्पादन शुल्काचा फायदा झाला, जे महसुलात जवळपास 25% ची मोठी वाढ झाली आहे. पारंपरिकरित्या जिथून मोठ्या प्रमाणात महसूल गोळा व्हायचा त्या मुंबई-ठाणे, पुणे नाशिक या विभागापेक्षा नागपूर औरंगाबाद कोल्हापूर विभागातील वाढ ही जास्त आश्चर्यकारक आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

नागपूरच्या महसुलात 42.9%, औरंगाबाद आणि कोल्हापूरने अनुक्रमे 29.7% आणि 28.5% अधिक विक्री नोंदवली आहे. मुंबई-ठाणे, पुणे आणि नाशिकच्या अबकारी महसुलात सुमारे 23% वार्षिक वाढ दिसून आली आहे.

असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर व्हेंडर्सचे उपाध्यक्ष सुमित चावला यांच्या मते, बिअर आणि वाईन विक्रीला उदारीकरण करण्याच्या राज्याच्या धोरणामुळे, विशेषत: नागपूर, कोल्हापूर आणि औरंगाबादमध्ये बिअर आणि वाईनच्या उपलब्धतेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे विक्रीत आणि महसुलात वाढ होते. यासोबतच, राज्याने अखेरीस बिअरवरील कर कमी केल्यास मुंबई-ठाणे, नाशिक आणि पुणे विभागातील विक्रीत मोठी वाढ होईल, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती