बारसू रिफायनरी विरोधात कालपासून आंदोलन सुरू माध्यमांनाही मज्जाव ही सद्य परिस्थिती?

0

मुंबई : बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमाराला पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तिथे करण्यात आला. बार्शी सोनगाव या भागाला जोडणारे रस्ते तसेच सर्वच नाक्यावरती पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. रिफायनरी प्रकल्प सर्वेक्षणस्थळाच्या मार्गावर जाणा-या प्रत्येक गाड्या अडवल्या जातायत. पत्रकारांना देखील पोलिसांकडून मज्जाव केला जातोय. रत्नागिरीतील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होत आहे. या प्रकल्पाच्या विरोधामध्ये स्थानिक लोकं आंदोलन करताना दिसत आहे.

संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार प्रत्येकाला स्वतःच्या मागणीसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु या आंदोलनाचे चित्रीकरण करत असताना माध्यम प्रतिनिधींना अडवून त्यांना सांगितले येथे परत येऊ नका, हे अत्यंत चुकीचे आहे. लोकशाहीमध्ये माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तरीसुद्धा त्यांना असं अडवणं म्हणजे लोकशाहीची गळचेपी करण्यासारखं असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन