१६ आमदार अपात्र होणार?; यामुळेच पालिका निवडणुकही पुढे कर्नाटकमध्ये ही भीती: आंबेडकर

0

शिवसेनेतून फुटल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. सरकारमधील १६ आमदार अपात्र ठरविण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने केली आहे. त्या याचिकेचा निर्णय कधीही येऊ शकतो. मात्र न्यायालयाला कुणालाही अपात्र ठरविण्याचा अधिकार नाही. न्यायालय जास्तीत जास्त तत्कालीन उपसभापती झिरवळ यांच्या निर्णयावर जो ‘स्टे’ दिला होता तो कदाचित उठविला जाईल. तसेच राज्यपालांच्या निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. हा घटनात्मक मुद्दा आहे. राज्यपालांच्या निर्णयावर ताशेरे ओढले जातील, मात्र त्यांचा निर्णय फिरवला जाणार नाही, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकारांनी व्यक्त केले. मुंबईतील साकीनाका येथे आंबेडकरांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. राज्यात सध्या सरकारबाबत अस्थिर वातावारण असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यावर आंबेडकरांनी सूचक वक्तव्य केले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

ते म्हणाले, “ज्यावेळी आपण म्हणतो राजकीय भूकंप होतो, त्यावेळेस त्याची काही लक्षणे दिसतात. दरम्यान राज्यातही तसेच दिसून आले. त्याबाबत मात्र मोठ्या प्रमाणात बातम्या झाल्याने होणारा भूकंप होता होता थांबला.” तसेच ते दोन राजकीय भूकंप होणार या वाक्यावरही ते ठाम राहिले. आंबेडकर म्हणाले, यापूर्वी मी जे दोन भूकंपाबाबत विधान केले आहे, त्यावर आताही कायम आहे. मात्र त्यातील सर्व सांगतले तर रस निघून जाईल. म्हणून ते मांडण्यात काही अर्थ नाही.

कर्नाटकमध्ये भाजपला पुन्हा सत्ता मिळणे कठीण असे मतही त्यांनी यावेळी केले. आंबेडकर म्हणाले, सध्या कर्नाटक विधानसभा निवडणूक आहे. तेथे सर्व विरोधी पक्ष भाजपला रोखू शकले तर आगामी लोकसभेचा खेळ वेगळा असणार आहे. कर्नाटकची रिपब्लिकन पार्टी १५ जागांवर लढत आहे. मी त्यांच्या प्रचाराला जाणार आहे, परंतु त्याचे सरकारी काँग्रेस आणि कुमार स्वामी यांना अडचण होणार नाही याची काळजी घेणार आहे. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होऊ नये, याचाही विचार करणार आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येण्याची काही लक्षणे दिसत नाहीत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होणार आहे. त्यामुळे राज्यातील या निवडणुका पुढे ढकलल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. ते म्हणाले, “मुंबई महापालिकेसह राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला असता. या निवडणुकीमुळे राज्याच्या विधानसभेसह देशाच्या राजकारणाची दिशा ठरली असती. त्यामुळेच महाराष्ट्रातील या निवडणुका राज्य सरकारने पुढे ढकलल्या आहेत.

पुलवामा घटनेवरुन आंबेडकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. आंबेडकर म्हणाले, पुलवामा घडले त्यावेळी मी शंका उपस्थित केली होती. मात्र एकाही कॅबिनेट मंत्र्याने अमित शहा यांना प्रश्न केला नाही. हा घातपात असून त्या घटनेच्या चौकशीची मागणीही मी केली होती. या घटनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा कारणीभूत आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार