भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रायगड जिल्ह्याच्या कोर्लई गावातील ठाकरे कुटुंबाच्या कथित बंगल्यांचा मुद्दा लावून धरला आहे. सोमवारी त्यांनी कोर्लई गावात जावून पुन्हा एकदा त्या जागेची पाहणी केली. मात्र गावकऱ्यांचा रोष पाहाता सोमय्यांनी गावातून काढता पाय घेतला. ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीच्या तथाकथित 19 बंगल्यांबाबत सोमय्यांनी आरोप केलाय. या बंगल्यांची पाहणी केल्यानंतर सोमय्या हे मुंबईला परतले.ग्रामस्थांच्या विरोधामुळे त्यांनी कोर्लई गावची भेट टाळली. भाजप नेते किरिट सोमय्यांनी सोमवारी रायगड जिल्ह्याच्या कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ठाकरे कुटुंबियांच्या जमिनीची पाहाणी केली. इकडे सोमय्या ठाकरे कुटुंबाच्या कथित 19 बंगल्यांच्या जागेची पाहणी करीत होते तर, दुसरीकडे कोर्लई गावातील वातावरण तापलं होतं. सोमय्यांविरोधात कोर्लईतील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली होती.






कारण सोमय्यांच्या तक्रारीनंतर कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सोमय्यांवरोधात असंतोष निर्माण झाला आहे. सोमय्यांनी बिनबुडाचे आरोप करत खोटी तक्रार दाखल केल्याचा पलटवार प्रशांत मिसाळ यांनी केला. सोमय्यांना जाब विचारण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
तसेच यावेळी ग्रामस्थांनी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोमय्यांनी कोर्लई गावातील ठाकरे कुटुंबाच्या कथित 19 बंगल्यांचं प्रकरण लावून धरलं आहे. सोमय्यांच्या पाठपुराव्यामुळेचं कोर्लईचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना तुरुंगवारी करावी लागली होती. सोमय्यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी चौकशीला सुरुवात झाली.
मात्र गावातील वातावरण तापल्यामुळे किरीट सोमय्यांना कोर्लई गावातून काढता पाय घ्यावा लागला. ‘रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आली आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे’, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.











