शहराचे सौंदर्यीकरण की विद्रुपीकरण?;अर्बन सेलच्या वतीने डॉ राजेंद्र भोसले यांना निवेदन

0
3

आपल्या पुणे शहरातील डेक्कन या ठिकाणी भिडे पुलालगत नदीपात्रात दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकला जात असून प्रशासन यावर मूग गिळून गप्प आहे. आज वाढते शहरीकरण पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे कारण ठरत असून जैवसाखळी नष्ट होत चालली आहे. अशा प्रसंगी प्रशासनाने कठोर भूमिका घेणे अपेक्षित असताना नदीपात्रात राडारोडा टाकल्याने नदीची वहन क्षमता कमी होणार आहे. परिणामी नदीची पुरस्थिती अधिक गंभीर बनणार असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे.

याबाबत पुणे मनपाचे मा. आयुक्त डॉ राजेंद्र भोसले सर यांना आज प्रत्यक्ष भेटून यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी व तसे न झाल्यास पुणे अर्बन सेलच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देन्यात आले आहे. तसेच माननीय महापालिका आयुक्त यांनी ताबडतोब सदर आपल्या पत्रावर त्वरित कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश सुद्धा दिले आहेत.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

शहराचे आरोग्य जपण्यासाठी व आपल्या शहराला मोकळा श्वास घेता यावा, यासाठी एक जागरूक नागरिक व अर्बन सेलचे पदाधिकारी म्हणून आपन प्रयत्नशील असने आवश्यक आहे. यावेळी पुणे अर्बन सेलचे शहराध्यक्ष स्वप्निल दुधाने तसेच कोथरूड अर्बन सेल विधानसभा अध्यक्ष सचिन यादव उपस्थित होते.