“ड्रोन’द्वारे पाकिस्तानमधून भारताला शस्त्रास्त्रे आणि ड्रग्सचा पुरवठा, BSFच्या जवानांनी एक ड्रोन पाडला

0

अमृतसर – सीमा सुरक्षा दलाने शनिवारी भारत-पाकिस्तान सीमेजवळ घुसखोरी करणारे एक ड्रोन पाडले. शनिवारी पहाटे आंतरराष्ट्रीय सीमेजवळील बच्चीविंड गावात हे ड्रोन दिसले होते. बीएसएफच्या जवानांनी या ड्रोन मधील सुमारे 3.2 किलो वजनाची हेरॉईनची तीन पॅकेट जप्त केली. 15 एप्रिल, रोजी पहाटे 3.21 वाजता, सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्या या ड्रोनवर गोळीबार केला.

याआधी गुरुवारी, सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्‍मीरच्या राजौरीमधील बेरी पट्टण भागात नियंत्रण रेषा ओलांडून आलेल्या ड्रोनचा माग काढला आणि तो पाडला.त्या ड्रोनमधून पाच एके मॅगझिन, काही रोख रक्कम तसेच एक सीलबंद पॅकेट जप्त करण्यात आले आहे. ड्रोन द्वारे भारतीय हद्दीतील आपल्या हस्तकांसाठी मादक द्रव्ये आणि शस्त्रे पाठवण्याचे काम सातत्याने केले जात आहे. पण सीमेवरील भारतीय जवान त्यांच्या या हालचालींवर कडक लक्ष ठेऊन आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती