मुख्यमंत्री शिंदे जेलवारीच्या भितीने मातोश्रीवर येऊन रडले! आदित्य ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

0
7

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या बंडानंतर सर्वात मोठे गौप्यस्फोट समोर आले आहे. जेलमध्ये जाण्याच्या भीतीने एकनाथ शिंदे भाजपमध्ये गेल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. भाजममध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असे शिंदे म्हणाले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

“एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असे ही आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी या सर्वात मोठ्या गौप्यस्फोटाचा खुलासा केला आहे. आदित्य म्हणाले, “हे चाळीस लोक स्वत:च्या जागासाठी आणि पैशासाठी गेले आहेत. सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळी माझ्याघरी येऊन, माझ्यासमोर रडत होते. कारण त्यांना केंद्रीय यंत्रणांकडून अटक करण्यात येणार होते. त्यांनी त्या वेळी सांगितलं की, मी भाजपसोबत गेलो नाही तर मला अटक होईल.”

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे