भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने26 मार्च 2023 रोजी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं.
अभिनेत्रीने उचललेल्या या टोकाच्या पावलाने सर्वांनाच धक्का बसला होता. ही 25 वर्षीय अभिनेत्री वाराणसीमधील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली होती. आकांक्षा ‘लायक हूं मैं नालायक नही’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तिथे गेली होती. दरम्यान ती एका हॉटलेमध्ये थांबली होती.
अभिनेत्रींच्या मृत्यूनांतर या हॉटेलच्या खोलीत कोणतीही सुसाइड नोट सापडली नव्हती. परंतु अभिनेत्रीची हत्या झाल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. या प्रकरणात अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड अभिनेता-गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांच्यावर हे आरोप लावण्यात आले होते. हे दोन्ही भाऊ गेल्या 11 दिवसांपासून फरार होते.
मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघांना अटक करण्यात आली आहे. गाजियाबाद पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आईने समर सिंगवर अभिनेत्रीला आपलं आयुष्य संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या आरोपांनंतर समर आणि त्याचा भाऊ फरार होता.
आकांक्षाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीत समर सिंहचा भाऊ संजय सिंह याचंही नाव आरोपी म्हणून आहे. या दोघांविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समर सिंग विदेशी पळ काढण्याच्या तयारीत होता. परंतु जेव्हा पोलिसांना या गोष्टीची भनक लागली, तेव्हा त्यांनी सर्व एयर्पोर्टसवर शोध सुरु केला होता. सारनाथ पोलिस ठाण्याचे एसएचओ धर्मपाल सिंह यांनी सांगितलं की, समर आणि त्याच्या भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर संबंधित कलमांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आकांक्षाच्या आईच्या तक्रारीच्या आधारे ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.