ठाकरे गटाचा वर्मावरच घाव “एसटी प्रवासात सूट देण्यापेक्षा बाराशे रुपयांचा सिलेंडर”

0

अंबाजोगाई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत असल्या तरी ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्राही जोरदार पणे सुरु होती. शिवसेनेच्या उपगटनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रेतूनही सरकारवर आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांवर जोरदार पणे हल्लाबोल केला होता. सुषमा अंधारे सध्या अंबाजोगाई दौऱ्यावर आहेत.

या दौऱ्यावर असतानात त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकाकरकडून करण्यात आलेल्या घोषणांवरही जोरदार टीका करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी अंबाजोगाई दौऱ्यावर असताना त्यांनी सरकारने नुकताचा जाहीर केलेल्या एसटी प्रवासातील 50 टक्के सूटवर त्यांनी टीका केली आहे. महिलांना एसटीच्या प्रवासात सूट दिली असली तरी महागाई आणि बेरोजगारी काही कमी झालेली नाही. गॅस सिलिंडरच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत.त्यामुळे प्रवासाचा फायदा जरी महिलांना होत असला तरी महागाईमुळे जनसामान्य लोकांच्या जीवनात मोठ मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामुळे एसटी प्रवासात सूट देण्यात आली असली तरी गॅस सिलिंडचा दर कमी करून महिलांना दिलासा देण्यात आला असता तर त्याचा खरा फायदा महिलांना मिळाला असता अशी टीका सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर केली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे अंबाजोगाई आणि परळी दौऱ्यावर असतानना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्य सरकारच्या धोरणावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. राज्य सरकारने नुकताच महिलांसाठी एसटीच्या प्रवासात 50 टक्के सूट दिली आहे. मात्र एसटी प्रवासात सूट देण्यापेक्षा बाराशे रुपयांचा सिलेंडर महिलांना चारशे रुपयांना उपलब्ध करून द्यावा असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका करताना त्यांनी चित्रा वाघ यांच्यावरही निशाणा साधला. चित्रा वाघ यांनी आज एसटीतून प्रवास केला त्याची जोरदार चर्चाही करण्यात आली. जशी सोय चित्रा वाघ यांना देण्यात आली तशीच सोय सर्वसामान्य प्रवाशांना मिळत नसल्याटी टीकाही त्यांनी केली आहे. चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना त्यांनी भाजप नेत्यांसाठी विशेष बसची सोय राज्य सरकारने केल्याचे चित्र दिसत असल्याचे म्हणते त्यांनी सरकारच्या धोरणात्मक निर्णयांवर टीका केली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता