सुपरस्टार रजनीकांत मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट…

0
1

दक्षिणेतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, याआधी रजनीकांत मुंबई
दौऱ्यावर शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची भेट घेतली होती. रजनीकांत त्यांच्या ‘रोबोट’ चित्रपटाच्या प्रमोशन
साठी मुंबईत होते त्यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर भेट घेतली.

सुपरस्टार थलायवा अभिनेते रजनीकांत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रजनीकांत यांनी
उद्धव ठाकरे यांची ही सदिच्छा भेट होती. ही कुठलीही राजकीय भेट नव्हती, रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सिम चाहते आहेत. रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध अतिशय चांगले
आहेत. त्यामुळेच रजनीकांत ठाकरे कुटुंबीयांची सदिच्छा भेटीसाठी आले होते, असे सांगण्यात आले.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!