सध्या जगभरात नाटू नाटू गाण्याची जोरदार चर्चा; अमेरिकन पोलिसांचाही गाण्यावर डान्स

0

मुंबई : ऑस्कर पुरस्कारांमध्ये दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याने बाजी मारली आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे १२ मार्च रोजी ऑस्कर पुरस्कार 2023 वितरण सोहळा पार पडला. चित्रपट रिलीज झाल्यापासूनच हे नाटू नाटू गाणं चर्चेत होतं. त्यानंतर त्याला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आणि नंतर आता पुरस्कारावरही या गाण्याने नाव कोरलं आहे. देशभरातील सर्वजण या विजयाचा आनंद साजरा करत आहेत. पण या दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये यूएस पोलीसही नातू-नातू गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

अमेरिकन पोलिसांचा नाटू-नाटू गाण्यावर डान्स
एका यूजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये कॅलिफोर्निया पोलीस ‘नाटू नाटू’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये अनेक लोक रस्त्यावर होळी खेळताना दिसत असून बॅकग्राऊंडमध्ये ‘नाटू नाटू’ हे गाणे वाजत आहे.

व्हिडिओ होतोय व्हायरल
सर्वसामान्यांसोबतच दोन पोलीस अधिकारीही या गाण्याच्या हुक स्टेप्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 11 मार्च रोजी शेअर करण्यात आला आहे, ज्यामुळे ऑस्कर पुरस्कारापूर्वीच या गाण्याची जादू जगभर पसरली होती हे स्पष्ट आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

RRR सिनेमाच्या टीमचं सेलिब्रेशन
आरआरआरच्या ऑस्कर विजेत्या सेलिब्रेशनचा व्हिडिओही समोर आला आहे. एका खोलीत, ‘RRR’ सिनेमाची टीम ऑस्कर विजय साजरा करत आहे. व्हिडिओमध्ये एमएम कीरावानी पियानो वाजवताना दिसत आहे आणि प्रत्येकजण त्याच्या तालावर नाचताना दिसत आहे. राम चरण, उपासना कामिनेनी, एसएस राजामौली आणि त्यांच्या पत्नीसह इतर अनेक लोक हजर दिसत आहे.

भारताला यंदा २ ऑस्कर पुरस्कार
यावर्षी भारताने एक नाही तर दोन ऑस्कर जिंकले आहेत. RRR च्या Naatu Naatu गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत पुरस्कार मिळाला, तर लघु माहितीपट द एलिफंट व्हिस्पर्सलाही या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन