भाजपा आमदाराच्या मुलाचा शाही विवाहसोहळा 70 लाखांचे फटाके; मंदिर गाभाऱ्यात प्रवेशबंदी तरीही खास विधी 

0

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचा भव्य विवाहसोहळा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आला होता. यानंतर आता सोशल मीडियावर आणखी एका भव्य विवाहसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळजवळ 40 सेकंदांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी होताना दिसत आहे. फटाक्यांची आतषबाजी पाहून सर्वसामान्यांचे डोळे दिपले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या भव्य विवाहसोहळ्यात केवळ फटाक्यांवर झालेला खर्च ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, इंदूरचे भाजपा आमदार राकेश शुक्ला उर्फ गोलू शुक्ला हे मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी एक मानले जातात. त्यांची एकूण मालमत्ता 61 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. कारण त्यांचा इंदूरमध्ये मोठा व्यवसाय आहे. बांधकाम साहित्यापासून ते क्रेन उत्पादनापर्यंत राकेश शुक्ला सर्व गोष्टींचा व्यवहार करतात. माध्यमातून वृत्तानुसार, राकेश शुक्ला यांच्याकडे पाच फॉर्च्युनर कार, आठ क्रेन आणि अनेक शस्र आहेत. याच राकेश शुक्ला यांच्या मुलाच्या म्हणजेच अंजनेश याच्या लग्नातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

एका व्हिडिओमध्ये, राकेश शुक्ला यांचा मुलगा आणि त्याची सून इंदूरमधील खजराणा मंदिराच्या गर्भगृहात हार घालताना दिसत आहेत. स्थानिकांचे म्हणणे आहे की, मंदिराच्या गाभाऱ्यात जनतेला प्रवेशबंदी असतानाही आमदाराच्या मुलाला आत जाण्याची परवानगी देण्यात आली. तसेच राकेश शुक्ला यांनी मुलाच्या लग्नासाठी केलेली शाही सजावट लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. संपूर्ण लग्नस्थळ धार्मिक परंपरेनुसार सजवण्यात आले होते, ज्यामध्ये हिंदू देवतांच्या मूर्तींचा समावेश होता आणि संपूर्ण समारंभात भक्तिगीतांचे मोठ्या आवाजात संगीत वाजत होते. मात्र या लग्नातील सर्वांचे आकर्षण राहिले ते म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी.

वरमाला विधी झाल्यानंतर आकाशात जी फटाक्यांची आतिषबाजी झाली, ती पाहून तिथे उपस्थित सर्वच थक्क झाले. जेव्हा आिषबाजी सुरू झाली, तेव्हा रंगीबेरंगी रोषणाईने आसमंत उजळून निघाले होते. अनेक मिनिटे या आिषबाजीकडे पाहण्यासाठी लोक मान वर करून बसले होते. जोरदार आवाज, चमकदार लाईट्स यामुळे लग्नस्थळी वेगळेच वातावरण तयार झाले होते. याच लग्नातील एक 40 सेकंदाचा फटाक्यांच्या आतिषबाजीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. महत्त्वाचे म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या दाव्यानुसार, लग्न सोहळ्यात फक्त फटाक्यांवर 70 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार