दीनदलितांचे कैवारी ज्ञानाचा सागर भारताचे कायदेमंत्री म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर : वैशाली रा. रसाळ

0

आज ६ डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राहत्या घरी निधन झाले. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री,भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडणारे महायोद्ध, उपेक्षितांच्या जीवनात अस्मितेची ज्योत पेटवणारे स्वतःच्या अलौकिक विद्वात्तेचा वापर समाजहितासाठी करणारे पाहिले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. बाबासाहेबांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलंबिया विद्यपीठ व लंडनमधील विद्यापीठातून घेतले. देशाच्या स्वतंत्र चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश देऊन त्यांनी गोरगरीब, दीनदलित व समाजाच्या न्याय हक्कासाठी अनेक आंदोलन व सत्याग्रह केले. सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले. महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या The problem of the Rupee It’s origin and it’s solution पुस्तकाच्या आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. मूकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत हे साप्ताहिक तर समता हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी समाज प्रबोधनाचे बहुमूल्य कार्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची सर्वात मोठी हस्तलिखित राज्यघटना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार बोलतात. जागतिक बौद्ध धर्म परिषदेत बौद्ध भिक्खुंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बोधिसत्व ही पदवी दिली.

भारत भूमीतील लुप्त होत जाणारे बुद्धचक्र 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले गतिमान

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

१४ऑक्टोबर१९५६ नवयान बुद्ध धर्मात केला प्रवेश

दिन विजयादशमी झाला धम्मचक्र प्रवर्तन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. त्यांनी लाखो अनुयायींसोबत १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर येथील दीक्षाभूमीवर नवयान बौद्ध धर्म स्वीकारला होता.

  अष्टपैलू व्यक्तिमत्व,ज्ञानसवादी तपस्वी, अमोघ वक्तृत्व व कुशल नेतृत्व असणारे युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर ६ डिसेंबर १९५६ रोजी काळाच्या पडद्याआड गेले. दादरच्या चैत्यभूमीवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. आजही अनेक जण ६ डिसेंबरला बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यास चैत्यभूमीवर येतात. आज ते जरी देहरूपाने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकांना स्फूर्ती चैतन्य देत आहेत.

भरपगारी प्रसूती रजा, महिलांना आरक्षण, समान नागरी हक्क, कामाचे ८तास तास तसेच दिवाळी बोनस अशा अनेक चांगल्या कायद्यांची राज्यघटनेत तरतुद करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम🙏

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

जय हिंद, जय भारत, जय भीम

                     -: महापरिनिर्वाण दिन:- 

: महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना

हा : हाक दिली मृत्यूने ६डिसेंबर१९५६ रोजी

: परलोकात जाता देह चूल पेटली नाही घराघरात

रि : रिक्त झाले मन ऐकून निधनाची वार्ता

नि : निखळला ज्ञानसूर्य, बोधिसत्व, युगप्रवर्तक

र् : रचनाकार घटनेचे आपणास कोटी कोटी प्रणाम

वा : वाट विकासाची दाखविली आपवण

: नवमातेला भरपगारी दिली सुट्टी

दि : दीन दलित, अस्पृश्यना दिला जगण्याचा हक्क

: नमन महामानवा आपल्या पवित्र स्मृतीस

वैशाली रा. रसाळ