नगरपालिका मतदानानंतर भाजप नेत्याच्या घरावर रात्री दगडफेक; गुन्हा दाखल करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर

0

यवतमाळ : यवतमाळमध्ये नगरपालिका निवडणुकांचं मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी भाजप नेत्याच्या घरावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. भाजपचे माजी ओबीसी प्रदेशाध्यक्षांच्या घरावर रात्री १२ वाजताच्या दरम्यान दगडफेक झाली. यवतमाळच्या पांढरकवडा येथील घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

भाजपचे माजी ओबीसी प्रदेशाध्यक्षांचं श्रीराम मेल्केवार असे नाव आहे. त्यांच्या घरावर रात्री बारा वाजताच्या सुमारास ५ ते ६ अज्ञात लोक आले. या लोकांनी मेल्केवार यांच्या घरावर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या. या अज्ञातांनी घरातील महिलांसमोर अश्लील शिवीगाळ केली. आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यवतमाळच्या पांढरकवडा भागात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरातील हजारो नागरिकांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यावर धडक दिली.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

घरावर दगडफेक करणाऱ्या अज्ञात आरोपींनी चेहऱ्यावर कापड बांधून तुफान केली होती. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्ता आणि गैरकायद्याची मंडळ जमविणाऱ्यासह विविध कलमान्वये पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ज्योती श्रीराम मेल्केवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सिंधुदुर्गातील सावंतवाडीत मतदानाच्या दिवशी झालेल्या राडा प्रकरणात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सावंतवाडीतील मतदान संपताच झालेल्या राडाप्रकरणी भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या 20-25 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात रात्री झालेल्या गोंधळात 40-50 कार्यकर्त्यांवरही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती मनुवादी विचारांना गाडून खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी करणारी संस्था आहे – आनंदराज आंबेडकर

भाजपच्या फिर्यादीनुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, नगराध्यक्ष उमेदवार नीता कविटकर यांच्यासह 20-25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. तर शिवसेनेच्या फिर्यादीनुसार भाजपचे विनोद राऊळ, अॅड. अनिल निरवडेकर यांच्यासह 20-25 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आलेत.