सम्यक कोकण कला संस्था रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाचे शनिवारी आयोजन

0

मुंबई दि. १७ (रामदास धो. गमरे) सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र या संस्थेचा रौप्यमहोत्सवी २५ वा वर्धापनदिन संस्था अध्यक्ष मंदार दाजी कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४:३० ते ६:३० दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता रोड दादर (पु.) मुंबई – १४ येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उद्घाटक बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते होणार असून सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट मान्यवर अतिथी म्हणून तसेच माजी आमदार यामिनी जाधव, बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, मराठी शाहीर परिषद कोकण विभागाचे अध्यक्ष शाहीर विश्वजित तथा हरिश्चंद्र लोखंडे, उद्योजक अमोल रोकडे, उद्योजक अशोक कवाडे, उद्योजक प्रदीप खेत्रे, उद्योजक अशोक धामणकर, उद्योजक सुशांत मोरे, समाजसेवक योगेश गावडे, समाजसेवक पांडुरंग साळवी, समाजसेवक किशोर खैरे, समाजसेवक विरेंद्र लगाडे, समाजसेवक प्रकाश खंडागळे, समाजसेवक भगवान तांबे, समाजसेवक हंसराज कासारे, समाजसेवक लवेश लोखंडे, समाजसेवक महेंद्र चाफे, रिपब्लिकन पक्ष विद्यार्थी सेना अध्यक्ष आशिष गाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार? 

सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या शुभहस्ते स्मरनिका व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, सम्यक कला भूषण जीवनगौरव पुरस्कार वितरण, जेष्ठ कलावंतांचा सन्मान व भीमबुद्ध गीतांची मैफिल असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच अमोल रोकडे यांच्या वतीने रात्री ८:३० ते ९:३० यावेळेत सस्नेह भोजन म्हणून भोजन दान करण्यात येईल तरी सम्यक कोकण कला संस्थेच्या रौप्यमहोत्सवी २५ व्या वर्धापनदिना निमित्त महाराष्ट्रातील तमाम कलावंतांनी सहभागी होऊन सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सम्यक कोकण कला संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात सचिव नरेश शिंदे आणि अध्यक्ष मंदार कवाडे यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!