कोथरूड क्षेत्रिय कार्यालय हिंदुविरोधी कार्यपद्धतीच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजातर्फे आंदोलन अन् निवेदन

0

कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालयाने वारंवार चालवलेल्या हिंदुविरोधी कार्यपद्धतीच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजातर्फे कोथरूड सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देण्यात आले असून हिंदू देवतांची विटंबना बंद नाही झाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये कोथरूड परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी ऊपस्थित होते.

जय भवानीनगर, पौडरोड, कोथरूड येथील भुयारी मार्गात श्री. छत्रपती शिवाजीमहाराज तसेच परम पवित्र भगवा ध्वजाच्या व भगवान श्री. हनुमान व श्री. गणपती यांच्या चित्रांवर गुटखा खाऊन थुंकले होते. तसेच श्री. हनुमानाच्या चित्राची विटंबना होईल अशा स्थिती मधे ते चित्र होते पुणे महापालीकेच्या कर्मचाऱ्यांनी रोजप्रमाणे सर्रासपणे दुर्लक्ष केले; हिंदुं जनतेच्या भावना दुखावल्या जातील याची साधी दखल सुद्धा पुणे महापालीकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी घेतली नाही तसेच भुयारी मार्गात महिला भगिनींच्या सुरक्षेसाठी सिसिटीव्ही कॅमेरा सुद्धा नसल्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला‌ आहे.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा

या भुयारी मार्गातील व्यावसायिक आस्थापना (चार दुकाने) सुरू केल्यास या भागातील रहदारी वाढेल व होणारी विटंबना थांबण्यास मदत होईल अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देताना करण्यात आली.