लाडकी बहिण महत्त्वाची घडामोड; निवडणुकीपूर्वी सरकारचा मोठा निर्णय! यामुळे नाव कमी होणार नाही? 

0

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेने विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. बिहारमध्येही ‘लाडकी बहीण’ फॅक्टर निवडणुकीत निर्णायक ठरला. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, सरकार या योजनेबाबत दोन मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. मात्र, काहींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याने सरकारने ई-केवायसी बंधनकारक केले आहे.

ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांची नावे योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळली जाऊ शकतात. ई-केवायसीची मुदत १८ नोव्हेंबर २०२५ आहे. दोन दिवस शिल्लक असतानाही राज्यातील २.३५ कोटी लाभार्थींपैकी तब्बल १.३ कोटी महिलांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. ही संख्या मोठी असल्याने सरकार मुदतवाढ देण्याच्या विचारात आहे, अशी शक्यता आहे.

अधिक वाचा  पुण्यात भाजपा मित्र पक्षाला मोठा धक्का; भाजपलाही धक्कादायक प्रवेशामुळे ही नवी भिती! एकावेळी २०० कार्यकर्त्यांचा सामूहिक राजीनामा

ई-केवायसीची मुदत वाढणार?

दरम्यान, राज्यात नगरपरिषद, नगरपंचायत आणि लवकरच महापालिका निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणुकांपर्यंत सरकार योजनेबाबत कठोर पावले उचलणार नसल्याची चर्चा आहे. महिलांच्या मतांचा प्रभाव लक्षात घेता, ई-केवायसीची मुदत वाढवली जाऊ शकते.

दुसरा महत्त्वाचा निर्णय काय?

ई-केवायसीसाठी महिलांना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड प्रमाणित करावे लागते. मात्र, ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाहीत, त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती. अशा महिलांसाठी सरकार वेबसाइटमध्ये तांत्रिक बदल करणार आहे. या महिलांना फक्त स्वतःचे आधार कार्ड प्रमाणित करून ‘अपूरण ई-केवायसी’ करता येईल. ही अपूर्ण प्रक्रिया १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे. नंतर अपूर्ण ई-केवायसी पूर्ण करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेतला जाईल.

अधिक वाचा  पक्ष प्रवेशातच वादळ काँग्रेस, उबाठा माजी नगरसेवकांचा प्रवेश; मंत्री महोदयांसमोर कार्यकर्ते भिडले बंदोबस्त तैनात

ई-केवायसी स्टेटस २ मिनिटांत कसे तपासावे?

लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर https://ladakibahinyojana.in जा. मुख्यपृष्ठावर ‘ई-केवायसी’ पर्यायावर . आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. आधारशी लिंक मोबाईलवर आलेला OTP टाका. प्रक्रिया यशस्वी झाल्यास ‘ई-केवायसी यशस्वी’ संदेश दिसेल. अपूर्ण असल्यास पुढील सूचना मिळतील.