बिहार नव्या सरकारच्या शपथविधी मुहूर्त अन् ठिकाण ठरलं, शपथविधी भव्यदिव्य करण्यासाठी तयारी जोरात

0

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळालं. यानंतर आता नव्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एनडीएच्या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली असून त्याचं ठिकाणही निश्चित झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या सरकारच्या शपथ सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. २० नोव्हेंबरला पाटना इथं ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी आयोजित करण्यात आलाय. एनडीएला बिहारमध्ये २०२ जागा मिळाल्या. यात भाजप मोठा पक्ष ठरला असून ८९ जागा जिंकल्या. तर जदयूने ८५, एलजेपीने १९ आणि इतर सहकारी पक्षांनी ९ जागा जिंकल्या.

जदयू प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी शेवटची मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. या बैठकीत विधानसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार त्यांचा राजीनामा देतील. नवं सरकार स्थापन करण्यासाठीची ही औपचारिकता असेल. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबरला संपणार आहे.

अधिक वाचा  भाजपची यादी पुण्यात दाखल अजूनही प्रवेश सुरूच?; प्रशांत जगतापांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम? काँग्रेसचे माजी राज्यमंत्री भाजपवासी?

पटनातील ऐतिहासिक गांधी मैदानावर २० नोव्हेंबरला शपथविधी होणार आहे. हे मैदान २० नोव्हेंबरपर्यंत सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आलंय. नव्या सरकारचा शपथविधी भव्यदिव्य करण्यासाठी तयारी जोरात सुरू आहे. शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय केंद्रीय मंत्री, एनडीएचं सरकार असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे इतर वरिष्ठ नेते सहभागी असणार आहेत.