कोथरूड ‘वारस सुरक्षे’साठी पित्र पंधरावड्यातही एकीकडे पालकांची धावाधाव आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांची खदखद

0

पुणे शहरामध्ये सध्या महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजत असतानाच कोथरूड या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारसंघांमध्ये मात्र निष्ठावान कार्यकर्त्यांची खदखद दिवसेंदिवस वाढत आहे. 25 ते 30 वर्षापासून कार्यरत असतानाही संधी मिळाली नाही आणि त्यातच पुन्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये ‘बिग शॉट’ प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यामुळे दोन-तीन दशकांपासून पक्ष विचारात वाहून घेतलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांची खदखद पत्रकार द्वारे बाहेर पडू लागली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यातील कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील अशी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली असून शक्ती प्रदर्शनामध्येही दोन गट आपापसात स्पर्धा करत असल्याने एकीकडे संघर्ष टोकाला जात असताना विरोधातील समविचारी ‘बिग शॉट’प्रवेशांची चर्चा संपूर्ण पित्र पंधरावड्यात रंगत होती.

 पुणे शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेने (उबाठा)ची अवस्था वरिष्ठ पातळीवर कळवण्यासाठी एका शिवसैनिकांनी थेट मुंबईची वाट धरत लेखी पत्रव्यवहार केला आहे. तीन दशकांपासून ज्यांनी पदे भोगली दावे केले अन् बंडाची ही भूमिका घेत नेतृत्वाला हतबल केले त्यांच्याच प्रवेशाची चर्चा जोरदार सुरू आहे. …..कोणी मुलासाठी ….कोणी पुतण्यासाठी जंग जंग पछाडत आहे ही खंत वरिष्ठांच्या कानावर घालण्यासाठी लेखी पत्रव्यवहार केला असून ते सध्या कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये व्हायरल होत आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाच्या एका महत्त्वाच्या पदावर असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्यांने सुद्धा याच अनुषंगाने जाहीर पोस्ट करत आपली खदखद व्यक्त केली आहे.

कोथरूड मध्ये व्हायरल निष्ठावान भाजपा कार्यकर्त्याचं पत्र जसेच्या तसे वाचकांसाठी…….

X कोथरूड मधील आमच्या सारख्या सर्व सामान्य माणसानं साठी व भाजपा पदाधिकाऱ्यांन साठी खुप खुप महत्त्वाचेच आहे विषय असा आहे की बरेच दिवसा पासुनकाय तर बरेच महिन्या पासुन कोथरूड मधील एक दुसऱ्या (उबाठा) पक्षातील नगरसेवक आपल्या भाजपा पक्षात येण्यासाठी मुंबई पासुन सर्व मंत्री महोदयांनची भेट घेत आहे पण मला वरीष्ठ नेते मंडळींना सांगायचे आहे की तो जो नगरसेवक आहे त्याची तुम्ही त्याच्या वार्ड (भागातील) ग्राऊंड लेवला सर्व सामान्य जनते मध्ये माहिती घ्यावी तो नगरसेवक किती भ्रष्ट आहे सामन्य लोकांना बांधकाम साठी पैसे मागणे, अर्धे बांधकाम मागणे, लोकांना नोटीस काढून अतिक्रमण कारवाई करायला लावणे स्वतःचे बांधकामे तर अतिक्रमण माखले आहेत. हॉटेल पासून ऑफिस, वाचनालय, व्यायाम शाळा, समाज मंदिर महानगरपालिका कडुन भाडे तत्त्वावर घेवुन स्वतः बाहेर भाड्याने दिले आहे. अजुन एक सांगायचे मध्ये त्यानी आपल्या सर्व भाजपा नगरसेवकांना वॉर्डात काम सुद्धा करून देत नव्हता एव्हढी त्याची दहशत होती आणि असे पण मी इलेक्शन दरम्यान मा. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन समिती ला मी बोलवणार आहे त्याची पूर्ण पोल खोल करणार आहे. तरी माझी सर्व नेते माननीयांना माझ्या सर्व सामान्य जनतेकडुन हात जोडुन विनंती आहे त्याला पक्षात घेवू नये अन्यथा आपल्या कोथरूड भाजपा पदाधिकारी कडुन सामूहिक राजीनामा दिला जाईल.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

xxxxxx

कोथरूड मध्ये व्हायरल निष्ठावान शिवसैनिकाचे पत्र जसेच्या तसे वाचकांसाठी…….

रौप्य महोत्सवी ‘भगव्या’ ची बांधिलकी!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा मावळा आणि कडवट शिवसैनिक फक्तं मिळालेल्या आदेशाच सिरसस्थ मानून आचार विचार आणि कृतीवर जयदीप तेवत ठेवतो. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या विचारांची बांधिलकी आणि हिंदुत्ववादी विचारांचा ध्यास या जीवावर कोथरूड (पूर्वीचे शिवाजीनगर) विधानसभा मतदारसंघात नवतारुण्यापासून गेली 25 वर्ष मी ‘शिवसैनिक’ म्हणून कार्यरत आहे. शिवसेनेचे पुण्यातील वैभव म्हणून कोथरूड विधानसभा मतदारसंघाला गणलं जात होते. बांधणी रचना आणि यश ज्या शिवसैनिकांच्या जीवावर पक्षाला मिळालं त्याच शिवसैनिकांच्या आयुष्यात आज ‘दरबारी’ लोकांच्या कट कारस्थानामुळे कोणत्या परिस्थितीत काम करावे लागत आहे! आज या विधानसभा मतदारसंघात परिस्थिती अत्यंत हलाखीची होण्यामागचं कारण? सध्या कालीन परिस्थिती काय? आगामी काळातील वाटचाल करताना कोणत्या दक्षता घ्याव्यात अन् पक्षनिष्ठित कार्यकर्त्याची तळमळ आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रप्रपंच….

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ‘कडवट’पणाच्या पक्क्या बांधणीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसैनिकांची पक्की बांधणी आणि नागरी हित जोपासत ‘शिवसैनिक’ मतदारसंघांमध्ये कार्यरत होता. पुणे शहरातील कोणत्याही मोठ्या पदाची झालर (उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष) या मतदारसंघात लागण्या अगोदर सर्व शिवसैनिकांना समान मानसन्मान दिला जात असताना अचानक पद भोगलेल्या कार्यकर्त्यांकडून(स्वयंघोषित नेता) मिळणाऱ्या त्रासदायक वागणुकीमुळे सर्वोच्च पातळीवर गेलेल्या या पक्षीय बांधणीला ग्रहण लागण्यास सुरुवात मूळच्या शिवसैनिक असलेले पदाधिकारी अन्य पक्षात(मनसे व भाजपा) जाऊन नगरसेवक होऊ लागले. शिवसेना या पक्ष विचाराची मूळ बांधणी आजही शिवसैनिकांमध्ये कायम आहे परंतु स्वहितार्थ पक्षाचा वापर करणारे लोकांकडून या शिवसैनिकांना न्यायच मिळत नसल्याने निराश झालेल्या या फळीला ‘नवसंजीवनी’ देण्यासाठी जनमानसात कार्यरत असणाऱ्या आणि शिवसैनिकांशी सौहार्दपूर्ण मित्रत्वाची वागणूक देणार विधानसभा स्तरावर नेतृत्व निर्माण झाल्यास ‘पोकळवासा’ भारतीय जनता पक्षाशी थेट आमने सामने लढत देणे शक्य होऊ शकते.

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आपणही कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला मित्र पक्षाची प्रचंड साथ असतानाही मतदारसंघातील स्व- पक्षातीलच हट्टवादी पदाधिकारी आणि दरबारी यामुळे काय परिणाम होणार याची जाणीव आपण याच देही याच डोळा घेतली असल्याने याबाबत जास्त बोलणं योग्य नाही. भारतीय जनता पक्षाचा वारू रोखण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त शिवसेना याच पक्षाकडे असून वरिष्ठ पातळीवरून योग्य साथ आणि आदेश मिळाल्यास आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला पाणी पाजण्याची ताकद कोथरूडमधील शिवसैनिकांमध्ये आहे. विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी यासंदर्भात चर्चा सुरू झाल्या असल्या तरी सुद्धा शिवसैनिकांच्या जिव्हारी लागणारी गोष्ट म्हणजे आजपर्यंत पक्षाने ज्यांना पोसलं, सांभाळलं आणि मोठं केलं तीच लोकं आता पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या चर्चा सार्वजनिक पणे केल्या जात आहेत. ज्या शिवसैनिकांच्या जीवावरती आजपर्यंत यांनी पदे उपभोगली शिवसैनिकांना कायमच दुय्यम वागणूक दिली, स्वहितार्थ ‘तुंबड्या’ भरल्या अशा लोकांनाच आजही ‘दरबारी’ शिफारशीने प्राधान्य दिले जात आहे ही पक्षाची हानी असून मूळ निष्ठावान शिवसैनिकांना संधी दिल्यास पक्षाचे गतवैभव प्राप्त होईल. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील घराघरांमध्ये आजही शिवसैनिकांविषयी आस्था आणि प्रेम कायम आहे परंतु योग्य नियोजन आणि उपक्रमांचे सातत्य सेवाभावी कृती या सर्व गोष्टींचा अभाव असल्याने मतदारसंघांमध्ये फक्त वाटप संस्कृती फोपाळली आहे. पाहिजेल ते फुकट या ‘सांताक्लॉजि’ वृत्तीने विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील विविध संस्थांच्या माध्यमातून शिवसेना पक्षाची विचारधारा हद्दपार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातच ज्या पदाधिकाऱ्यांनी मोठ-मोठी पद उपभोगली त्यांच्याकडून मात्र चिडीचूप भूमिका घेतल्याने वरिष्ठ पातळीवरूनच याबाबत दिशादर्शक निर्णय होण्याची अपेक्षा शिवसैनिकांना आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पुणे महापालिकेमध्ये हमखास नगरसेवक होण्यासाठी सध्या अट्टाहास सुरू असून भलेभले सुरक्षित छताखाली आसरा शोधण्यासाठी धावाधाव करत आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही मतदानाच्या दरम्यान जाणकारांना योग्य तो व संदेश देण्याचे काम मतदारांनी केल्यामुळे सर्वत्र हैराण वातावरण झाल्याची चर्चा आहे. कोथरूडमध्ये कायम नगरसेवक पदांची संधी आपल्याच कडे असावी अशी भूमिका घेणारी ‘बिग शॉट’ मंडळीच सुरक्षित आसरा करण्यासाठी हेलपाटे मारत असल्याने कार्यकर्ते नाराज होणे साहजिक आहे. सरतेशेवटी एक प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो तो म्हणजे कार्यकर्त्यांच्या नशिबी काय? पुन्हा झेंडे अन् सतरंज्याच!