मुंबई दि. २० (रामदास धो. गमरे) इ.स.पू. ५ व्या शतकात (सुमारे इ.स.पू. ५८८ च्या सुमारास) भगवान बुद्धांनी सुरू केलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेच्या पार्श्वभूमीवर बौद्धजन सहकारी संघ संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गाव पातळीवर गाव शाखेच्या व मुंबई येथे मुंबई शाखेच्या एकमताने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत प्रत्येक रविवारी वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात येते सालाबादप्रमाणे याही वर्षी सुरू असलेल्या “वर्षावास प्रवचन मालिका – २०२५” चा सांगता समारंभ रविवार दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४:०० वाजता बौद्धजन सहकारी संघ मुंबई शाखा अध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुनी बी. डी. डी. चाळ – ३ अ व ४ अ च्या मध्ये, नायगाव, दादर (पु.), मुंबई – १४ येथे आयोजित करण्यात आला आहे.






सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धजन सहकारी संघाचे सरचिटणीस संदेश गमरे व संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहिते हे करणार असून संस्कार समितीचे अध्यक्ष संदीप गमरे स्वागताध्यक्ष म्हणून पाहुण्यांचे स्वागत करतील तसेच भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष संजय पवार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून “बौद्ध धम्माची ओळख” या विषयावर ते व्याख्यान देतील.
सदर कार्यक्रमास प्रमुख विश्वस्त सिद्धार्थ पवार, माजी प्रमुख विश्वस्त संजय पवार, विश्वस्त दीपक जाधव, पांडुरंग गमरे, माजी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, के. सी. जाधव, एस. बी. जाधव, माजी कार्याध्यक्ष संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, मुंबई कार्याध्यक्ष दीपक मोहिते, उपकार्याध्यक्ष अशोक कदम, चिटणीस अजय जाधव, संदेश जाधव, कोषाध्यक्ष प्रदीप कदम, न्यायदान कमिटी अध्यक्ष संजय पवार, शिक्षण कमिटी अध्यक्ष संजीवन यादव, विवाह मंडळ अध्यक्ष धम्मवर्धन तांबे, सदस्य उत्तम जाधव, अमित पवार, सुरेश गमरे, न्यायदान कमिटीचे माजी अध्यक्ष शशिकांत मोहिते, माजी सरचिटणीस संजय तांबे, माजी खजिनदार संदीप पवार, अंतर्गत शैलेंद्र पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
तरी सर्व विभागाचे विभाग अधिकारी, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कमिटी व त्यांचे पदाधिकारी, सर्व उपसमित्या व त्यांचे पदाधिकारी, महिला मंडळ, सभासद, उपासक, उपासिका, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केले आहे.











