मुख्यमंत्री फडणवीसांचा पडळकरांना फोन, एका फोनने भाषाच बदलली पण सुंभ मात्र! म्हणाले…

0

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली. अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्यांनी विधन केलं, त्यामुळे राज्यभरातून त्यांचा निषेध होतोय. एवढी करुनही ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन गेल्यानंतर पडळकरांची भाषा बदलली आहे.

या प्रकरणी शरद पवार यांनीही मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करुन नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पडळकारांना चांगलंय सुनावल्याची सूत्रांची माहिती आहे. फडणवीसांच्या फोननंतर पडळकरांनी माध्यमांशी संवाद साधल आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं पालन करणार असल्याचं म्हटलं.गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला होता. यासंदर्भात अशी वक्तव्ये करु नका, अशी सूचना मला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यांच्या सूचनेचं मी पालन करणार आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

इथून मागच्या विधानांचं काय? असं विचारल्यानंतर पडळकरांनी इथून पुढे सूचनांचं पालन करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या विषयात ते माफी मागणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय.

शरद पवार, अजित पवारांकडून नाराजी

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या प्रकरणावर फोनवर चर्चा केली. ‘असं वागणं बरं नाही’,असं त्यांनी म्हटलं. अशा नेत्यांना आवरा, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

अजित पवार यांनीही पडळकरांच्या विधानाचा समाचार घेतला. भाजपच्या लोकप्रतिनिधींचे किंवा त्यांच्या नेत्यांचे चुकत असेल, तर त्याची नोंद भाजपने घ्यायला हवी. वादग्रस्त वक्तव्यावरुन महायुतीचे धोरण ठरलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप संदर्भातील जबाबदारी असल्याने ते यावर निर्णय घेतली, असं पवार म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती