या महिन्यात मोठा राजकीय बदल होणार, अजितदादांच्या मागची साडेसाती कधी संपेल? जाणून घ्या भविष्य….

0

सध्या राशीच्या अष्टमातील मंगळाच्या भ्रमणामुळे महिला आयपीएस अधिकाऱ्याबरोबर झालेले संभाषण व्हायरल झाल्यामुळे अजित पवारांना नमते घ्यावे लागले आहे. मंगळाचे कन्या राशीतील भ्रमण १३ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. तर साडेसाती २०२७ जूनपर्यंत असणार आहे. या काळात राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाविषयी न्यायालयीन लढाईची टांगती तलवार असेल, असं भाकित ज्योतिष्याचार्य मारटकर यांनी वर्तवलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असून, दोघांची राशी एकच म्हणजे कुंभ आहे. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. फडणवीस यांच्याप्रमाणे अजित पवार यांच्या साडेसातीचाही शेवटचा टप्पा चालू आहे. मुख्य पत्रिकेत धनस्थानी केतू असून, बुध-हर्षल युती व शुक्र-मंगळ युतीमुळे अनेक वेळा स्पष्ट बोलण्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला आहे, असंही ते म्हणाले. मूळ पत्रिकेत सिंह राशीतील मंगळामुळे कायम सत्तेत राहण्याची संधी मिळाली आहे. तर रवी, हर्षल योगामुळे विक्रमी वेळा उपमुख्यमंत्री पदावर काम करण्याची नोंद अजित पवार यांच्या नावावर आहे. डिसेंबर २०२५पर्यंत प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर मोठे बदल अपेक्षित आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

१३ सप्टेंबर रोजी मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. भारताच्या मकर राशीकडून मंगळाचे भ्रमण दशमस्थातून होणार आहे. याचा परिणाम देशाच्या राजकीय परिस्थितीवर होण्याची शक्यता असून, सत्ताधारी पक्षासाठी हा काळ कटकटीचा राहील. मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो, असं भाकितही त्यांनी वर्तवलं. या मंगळामुळे सीमेवर युद्धजन्य स्थिती अनुभवास येण्याची शक्यता असून शेजारी राष्ट्राकडून कुरापती काढल्या जातील. दहशतवादी आणि माओवादी मारले जातील. शत्रू पक्ष आणि शत्रू राष्ट्रांवर विजय मिळेल, असंही ते म्हणाले.

या काळात पोलिस, लष्कराला विशेष अधिकार दिले जातील. तुळेच्या मंगळाचे भ्रमण जगातील काही देशांना युद्धाला प्रवृत्त करणारे राहील. युद्ध, दहशतवादी, कारवाया, स्फोटक घटना, आगीचे अपघात यामधून मोठी हानी संभवते. या काळात मोठे न्यायालयीन निर्णय गाजतील. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व चिन्हांच्या खटल्यांचे निकाल या काळात लागण्याची शक्यता वाटते. याच काळात सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा शनी बरोबर प्रतियोग होणार आहे. यामुळे सत्ताधारी पक्ष, प्रमुख पदांवरील व्यक्ती, राजकीय व्यक्ती अडचणीत येण्याची शक्यता राहील, असंही ते म्हणाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती