माजी सहाय्यक पोलिस आयुक्तांची थेट सुनेवर बळजबरी; नवऱ्याकडून मूल होऊ शकत नाही, माझ्याशी संबंध ठेव

0

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात सासरा आणि सुनेच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना उडकीस आली आहे. स्वतःचा मुलगा आपत्य देण्यास सक्षम नसतानाही विवाह लावून देत एका निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने नवविवाहित सुनेवर बळजबरी करुन शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडितेने कशीबशी सुटका करुन घेत पोलिस स्टेशन गाठले. यानंतर कधीकाळी रक्षक म्हणून वावरणाऱ्या माजी सहाय्यक पोलिस आयुक्ताचा लंपट चेहरा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील सहकारनगर मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडिता ही ३० वर्षांची असून तिचा महिन्यापूर्वीच निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या मुलाशी थाटामाटात विवाह झाला आहे. आपला मुलगा सुनेला वैवाहिक सुख देण्यास व पिता बनण्यास सक्षम नाही हे त्याच्या कुटुंबाला माहित होते याची माहिती लपवून पीडितेशी लग्न लावले. लग्नानंतर काही दिवसात आरोपी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने घरामध्ये कोणी नसताना सुनेच्या खोलीमध्ये जाऊन सगळी परिस्थिती तिला सांगून माझ्या मुलाकडून तुला अपत्य होणार नाही त्यामुळे तुला माझ्याकडूनच या गोष्टी कराव्या लागतील अशी लंपट विनवणी केली. वरिष्ठ अधिकारी असलेल्या आपल्या वडीलधारी सासऱ्यांच्या तोंडीच अशी भाषा ऐकून पीडितेच्या पायाखालची जमीनच हादरली असताना वडीलधारी सासऱ्याची वासनांध ज्या शरीरावर भिडण्यास सुरुवात झाली. सगळ्या परिस्थितीतून पीडितेने कसेबसे स्वत:ला सावरले. सासर्‍याच्या या ऑफरला नकार देऊन कौशल्याने आपली सुटका करून घेतली अन् थेट पोलीस स्टेशन गाठले. पीडितेने पोलिसांना सर्व हकीकत सांगितली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पीडित महिलेने सांगितलेला सर्व प्रकार ऐकूण पुणे शहर पोलिसही अवाक् झाले. आता याप्रकरणी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सह त्याची पत्नी आणि पीडितेच्या पतीविरोधात सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेतू पुरस्कर नव विवाहितेची फसवणूक करणे, विनयभंगाच्या हेतूने व्यवहार करणे यासारख्या कलमाखाली गुन्हा दाखल करत पोलिस पुढील तपास करत आहेत.