बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा अभ्यास करायला २१ वर्षे घालवली विचारवंतांचा या मताशी मी सहमत नाही – बौद्धाचार्य महेश कांबळे

0
20

मुंबई दि. ३० (रामदास धो. गमरे) “हिंदू धर्मात सुधारणा व्हावी जुन्या चालीरीती, अनिष्ट व जाचक रूढी परंपरा मोडीत काढत नव्या विज्ञानवादि समाजाची रचना व्हावी याकरता बाबासाहेबांनी अनेक प्रयत्न केले तरी हिंदू धर्मातील सनातनी मनुवादी नव्या बदलास मान्यता देत नव्हते उलटपक्षी गल्लाभरू मनुवादी बाबासाहेबांना विरोध करण्यासाठी तळागाळातील मागासवर्गीय दलित समाजावर अतोनात अन्याय करू लागले म्हणून ‘मी हिंदू धर्मात जरी जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही’ अशी सिंहगर्जना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३५ साली नाशिक येवले येथे केली आणि १९५६ साली आपल्या शब्दाची पूर्तता करीत गौतम बुद्धांचा धम्म स्वतः घेतला व इतरांना ही दिला त्यामुळे बाबासाहेबांना अभ्यास करायला एकवीस वर्षांचा काळ लागला असे अकलेचे तारे काही विचारवंत तोडत असतात मला त्यांची कीव येते त्यांच्या बिनबुडाच्या विचारांशी मी सहमत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथ प्रस्तावनेत अस म्हणतात की ‘दादा केळुस्कर गुरुजींनी मला १९०७ साली भगवान बुद्धाचे चरित्र दिले त्याचवेळी मला खऱ्या अर्थाने मला बुद्धाची आणि बुद्धाचा धम्माची ओढ लागली’ तसेच महानायक, प्रबुद्ध भारत, जनता, समता, बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात ही बाबासाहेबांचे अग्रलेख, लेख हे बुद्धाचे विचार मांडणारे आढळतात, तसेच बाबासाहेबांचे चरित्र खंड १८ पान क्र. ४६३ यात ते बुद्ध धम्माच्या गाभ्यावर प्रकाशझोत टाकतात, १९२७ महाड चवदार तळे सत्याग्रह प्रसंगी बाबासाहेबांचे सहकारी सहस्त्रबुद्धे यांनी नमूद केलं आहे की ‘बाबासाहेबांनी सूचना केली आहे की उपासक उपासिकांनी भन्तेजीं सोबत बसू नये भन्तेचे स्थान हे उच्च असावं’ अश्या सूचना दिल्या होत्या याचा अर्थ बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा अभ्यास खूप आधीच केला होता, बौद्ध धम्म घेण्याआधी बाबासाहेबांनी पाली भाषेचा अभ्यास करून त्रिपिटिक व इतर बौद्ध ग्रंथातील ४००० हुन श्लोक, गाथा यांचा अभ्यास करून त्यांनी The Buddha and his Dhamma हा ग्रंथ लिहिला. सामाजिक कार्य, राजकारण, मंत्रिमंडळ, पदभार, पक्षाचे काम, वकिली पेशा हा सर्व व्याप व कामाचा जास्त ताण असल्याने बाबासाहेबांना उतारवयात अनेक व्याधी जडल्या होत्या १९५० ते १९५५ साली त्यांचे प्रकृतीमान खालावतच होती काही पत्रात प्रकृतीबाबत बोलताना त्यांनी नमूद ही केले होते की ‘मी आता मृत्यूच्या छायेत आहे’ त्याचवेळी त्यांना हिंदू कोड बिल सादर करायचे होते त्यातही त्यांचा बराच वेळ गेला, सातत्याने आजारपण ही त्यांना त्रास देत होते व सोबतच काम कामाचा वाढता व्याप यातून बाबासाहेबांनी जेवणाची ही फुरसत ही मिळत नव्हती म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा अभ्यास करायला एकवीस वर्षांचा प्रदीर्घ काळ घालवली असे म्हणणाऱ्या विचारवंतांशी व त्यांच्या मताशी मी सहमत नाही” असे प्रतिपादन बौद्धाचार्य महेश ह. कांबळे यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध व त्यांचा धम्म” या विषयावर वर्षावास प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प गुंफत असताना केले.

अधिक वाचा  सत्येच्या केंद्रस्थानी कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी शिवसेनेशी युती; मा. आनंदराज आंबेडकरांची भूमिका स्पष्ट झाली

बौद्धजन पंचायत समिती संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले असून त्या प्रवचन मालिकेचे तिसरे पुष्प उपसभापती विनोद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर बा. मोरे यांनी आपल्या धीरगंभीर पहाडी आवाजात केले तर संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून देत प्रस्ताविक सादर केले.

सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, मनोहर सखाराम मोरे, अतिरिक्त चिटणीस श्रीधर साळवी, विठ्ठल जाधव, यशवंत कदम, राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, तुकाराम घाडगे, अतुल साळवी, चिंतामणी जाधव, महेंद्र पवार, रवींद्र शिंदे, सिद्धार्थ कांबळे, महिला मंडळ अध्यक्षा सुशीलाताई जाधव, उपाध्यक्षा उर्मिलाताई मर्चंडे, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कार्यकारिणी, सर्व शाखांचे पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, बौद्धाचार्या, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी मनोहर बा. मोरे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे