चाकणची वाहतूक कोंडी मुक्तीकडे वाटचाल! सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची बैठक; आमदार महेश लांडगे यांचा सकारात्मक पाठपुरावा

0
23

गेल्या अनेक वर्षांपासून चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधांबाबतच्या समस्यांवर ठोस उपायोजना झाल्या नाहीत. परिणामी, चाकरमानी, वाहनचालक आणि औद्योगिक कंपन्या त्रस्त झाल्या होत्या. मात्र, आता औद्योगिक क्षेत्र समस्यामुक्तीच्या दिशेने वाटचाल करील, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि विविध समस्यांबाबत औद्योगिक संस्था संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनी #UNCLOG_Chakan_MIDC मोहीम हाती घेतली. तसेच, काही दिवसांपूर्वी आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मुंबई येथील दालनामध्ये चाकण औद्योगिक क्षेत्र वाहतूक कोंडी आणि समस्यामुक्त करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या मावळ, खेड परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासह अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता, एमएसआयडीसी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे, मुख्य अभियंता, एमआयडीसी, पुणे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड, मुख्य अधिकारी, चाकण/तळेगांव नगरपालिका असे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. चाकण हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असून, सध्या येथे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या औद्योगिक क्षेत्रापुरत्याच मर्यादित नसून, स्थानिक रहिवाशांच्या जीवनमानावरही प्रतिकूल परिणाम घडवत आहेत, अशी भूमिका मा. मंत्रीमहोदय यांच्यासमोर आमदार लांडगे यांनी मांडली.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

हिंजवडीप्रमाणे ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’ करा: महेश लांडगे यांची मागणी
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड) एलिव्हेटेड कॉरिडॉर भूसंपादन (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पीएमआरडी, एमआयडीसी, नॅशनल हायवे, पीडब्ल्यूडी किंवा जिल्हा परिषद अशा सर्व अस्थापनांशी समन्वय करण्यासाठी ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’) पिंपरी-चिंचवडमधून चाकण औद्योगिक पट्टयात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचा विस्तार आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ (हडपसर ते यवत) आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ डी (तळेगाव–चाकण–शिक्रापूर) काम सुरू करणे. यासह रस्त्यांचे विस्तारीकरण व देखभाल, वाहतूक नियंत्रण व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक सुधारणा, पार्किंग व्यवस्थापन, औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग (फ्रेट कॉरिडॉर), स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत, नगरपालिका), MSRDC, PWD, RTO आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय करुन दीर्घकालीन वाहतूक मास्टर प्लॅन तयार करून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याची मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे. त्याला मंत्री महोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

‘हिंजवडी आयटी पार्क’ वाहतूक कोंडी आणि समस्यामुक्त करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा महायुती सरकारच्या माध्यमातून ‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’ निश्चित केली आणि कामाला सुरूवात झाली. त्याचप्रमाणे आता चाकण औद्योगिक क्षेत्र सममस्यामुक्त करण्यासाठी आम्ही सकारात्मक भूमिकेतून पाठपुरावा करीत आहोत. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासोबत बैठक झाली. लवकरच मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थित आढावा बैठक घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. UNCLOG_Chakan_MIDC आम्ही सक्रीय आणि सकारात्मक पाठपुरावा करीत आहोत. अशी प्रतिक्रिया महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.