मैदानात जडेजा-सुंदरने धुतले अन् पत्रकार परिषदेत गंभीरने बोलती केली बंद करत इंग्लंडला हे सुनावलं….

0
22

भारत आणि इंग्लंड पाच सामन्यांची कसोटी मालिका आता अंतिम टप्यात येऊन पोहोचली आहे. चौथा कसोटी सामना भारताने खेळून ड्रॉ करत असताना इंग्लंडचे खेळाडू वैतागताना दिसले. भारताकडून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकी खेळी करुन भारताला पराभवाच्या स्थितीतून बाहेर काढले. सामन्यात एक अशी वेळी आली होती जेव्हा सुंदरने इंग्लंडच्या खेळाडूचा भर मैदानात अपमान केल्याचे पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारत आणि इंग्लंडयांच्यातील ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या मिनिटांत बरीच नाट्यमयता पाहायला मिळाली. 138 व्या षटकानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने अनिर्णित राहण्याचा प्रस्ताव दिला. सामना निकाल लागणार नाही हे निश्चित होते. त्यानंतरही रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी स्टोक्सला नकार दिला. दोन्ही फलंदाज शतकाच्या जवळ होते. जडेजा 89 धावा काढल्यानंतर खेळत होता आणि सुंदर 80 धावा काढल्यानंतर खेळत होता. इंग्लंडच्या खेळाडूंना हे आवडले नाही आणि मैदानावरील वातावरण तापले.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

भारतीय फलंदाजांनी मैदानावर इंग्लंडला पाणी पाजले त्यानंतर पत्रकार परिषदेत गंभीर यांनीही इंग्लंडची बोलती बंद केली. गंभीरला या वादावर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, “जर कोणी 90 धावांवर फलंदाजी करत असेल आणि दुसरा 85 धावांवर, तर ते शतकाचा हक्कदार नाहीत का? ते निघून जातील का? जर इंग्लंडचा एखादा खेळाडू 90 किंवा 85 धावांवर फलंदाजी करत असेल आणि त्याला त्याचे पहिले कसोटी शतक झळकावण्याची संधी मिळाली, तर तुम्ही त्याला तसे करू देणार नाही का?”

वॉशिंग्टन सुंदरने दुसऱ्या डावात पहिले कसोटी शतक झळकावले. त्याच्या शतकासह, भारतीय संघ सामना अनिर्णित ठेवण्यास सहमत झाला आणि हस्तांदोलन केले. गंभीर म्हणाला, “पाहा, ते त्यांच्यावर अवलंबून आहे. जर त्यांना असे खेळायचे असेल तर ते त्यांच्यावर अवलंबून आहे. मला वाटते की दोघेही शतकाच्या पात्रतेचे होते आणि त्यांनी ते मिळवले.” भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने कसोटीतील पहिले शतक झळकावले. दुसरीकडे, जडेजाचे पाचवे आणि इंग्लंडमधील दुसरे शतक त्याच्या बॅटमधून आले.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा