यु-१५ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्वास विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे यश; जळगाव राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

0
1

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास विद्यानिकेतनच्या मुलांनी सांगली येथे झालेल्या यु-१५ बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये यश संपादन केले. या स्पर्धेत जय दशरथ गायकवाड, संस्कार सचिन भरणे, वरूण प्रदीप मुळीक, रविराज आबासाहेब जाधव, स्वस्तिक विलीन महांगडे यांनी सुवर्णपदक, तर शैलेश भीमराव पडघणे, श्रीहर्ष सचिन नलवडे, समर्थ संताजी पाटील, आदित्य विजय चव्हाण, तन्मय देवदास शिंदे, आर्यन सचिन वाघमारे यांनी रौप्य आणि स्वराज किरण इथापे, रुद्र स्वप्नील मारणे यांनी कास्य पदक पटकावले.

यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, रोहित नाईक, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. आर. वरेकर, वस्तीगृह अधीक्षक जोतिर्लिंग पाटील यांनी केले. या खेळाडूंची जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक उदय पाटील, प्रथमेश मोरे, सुमित खांडेकर, राजेश पाटील, सूरज माने, ऋषिकेश पाटील, यांचे मार्गदर्शन मिळाले.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर