पुण्यात चांदणी चौक हायवेवर भीषण अपघात; अग्निशमन दलाकडून रिक्षाचालकाची थरारक सुटका

0

पुण्यात बावधन कडून वारजेकडे जाणाऱ्या हायवेवर वेद विहार समोर रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. MH 12 QR 4621 या क्रमांकाच्या रिक्षाचा रस्त्याच्या डीवायडरवर अपघात झाला आणि रिक्षाचालक रिक्षामध्ये अडकून पडला होता. घटनेनंतर तात्काळ आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली आणि अग्निशमन विभागाच्या टीमने अत्यंत शिताफीने बचावकार्य पार पाडले.

अपघातग्रस्त रिक्षामध्ये अडकलेले रिक्षाचालक गणेश कोळसकर (वय ३५) यांची सुटका करण्यासाठी वारजे फायर ब्रिगेड, NDA अग्निशमन केंद्राची फायर गाडी, आणि रिस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्प्रेडर कटर च्या सहाय्याने अडकलेल्या चालकाचे दोन्ही पाय मोकळे करत त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यानंतर तातडीने अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

दरम्यान, अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतुकीस धोका होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या. या बचावकार्यात अग्निशमन अधिकारी सुनिल नामे यांच्या नेतृत्वाखालील टीमने कामगिरी बजावली. टीममध्ये फायरमन विजय स्वामी, बाळू तळपे, आशिष सुतार, कोंडीबा झोरे, भंडारी, जांभळे, तसेच ड्रायव्हर गोडसे, कल शेट्टी आणि चौरे यांचा सहभाग होता.