‘रामराज्या’चा पोक्त कारसेवक… सशक्त… व्यासंगी राष्ट्रभक्त! उपलब्ध कटीबद्ध वचनबध्द!

0
1

राष्ट्रभक्तीचा वारसा आणि विचारांचा वसा घेऊन लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आणि हिंदुत्वादी विचारांशी जोडलेली नाळ हैदराबाद मुक्ती संग्रामात वडील स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर वामन देशपांडे यांच्या संस्कारपीठात झालेली जडणघडण यामुळेच कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये राम राज्याचा पुरस्कार करणारा सशक्त व्यासंगी कारसेवक म्हणून शाम देशपांडे यांचा नामउल्लेख केला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पक्की बांधणी असल्याने त्याच विचारांनी प्रवृत्त झालेल्या श्याम देशपांडे यांच्या कार्यामुळे कोथरूडचा गाभा असलेल्या डहाणूगर कॉलनीचा कायापालट करण्यामध्ये याच संगे विचारांची दूरदृष्टी आणि व्यासंगी विचार यामुळे कोथरूडला एक नवा दर्जा निर्माण झाला. अशा सशक्त व्यसंगी राष्ट्रभक्त श्याम देशपांडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

पुणे महापालिकेत काम करताना रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज आणि अन्य नागरी सुविधा नगरसेवकाकडून अपेक्षित असतात, त्यात अडकून न पडता विकासकामांना वेगळ्या टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न करत लोकसहभाग वाढवून कोथरूड भागाचा शाश्वत विकास करण्यासाठी अनमोल योगदान आहे. पुण्यात सर्वात प्रथम UTWT तंत्रज्ञान युक्त रस्ते डहाणूकर कॉलनीत तयार केले असून गेल्या दहा वर्षांपासून कोणतीही दुरुस्ती न करावी लागणे हे दूरदृष्टी विचार कृतीत आणण्याचे काम श्याम देशपांडे यांच्या मार्फत करण्यात आले. जनसेवेची आव्हाने, समाजकारणाचा दृष्टीकोन नेहमी नाविन्यपूर्वक आणि शाश्वत काम प्रभागातील सुविधांपुरते मर्यादित न ठेवता  पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना PMPLचा मोफत पास देण्याची व्यवस्था….. दहावी-बारावीच्या गुणवंत विद्याथ्यांना शिष्यवृत्तीची कल्पक योजनाही करण्यामध्ये मोलाचे योगदान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्यानामध्ये ‘गीतरामायण’ या कल्पनेवर आधारित ‘थीमपार्क’ साकारल्याने अभिनव संकल्पनेचे कोथरुडकरांनी मनापासून केलेले कौतुक केले आहे.

शांत प्रवृत्तीचे आणि समस्या सामोपचाराने सोडविण्यात रस असला तरीही  पुण्याच्या पर्यावरणावर घाला घालणाऱ्या ‘बीडीपी’ विरोधात रस्त्यावर उतरून ८० हजार सह्यांची मोहीम राबवून आंदोलन करून पुण्यातील टेकड्या वाचविल्या. अण्णाभाऊ साठे सभागृह आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये ‘हे राम नथुराम’च्या प्रयोगांना संरक्षण देत विचारांसाठी ठाम राहण्याचे काम फक्त श्याम देशपांडे यांनीच केले. पुण्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोथरुडच्या संस्कृतीला, परंपरेला आणि स्वभावाला साजेसा असा नगरसेवक बनण्याचा प्रयत्न केला आहे. गेली २० वर्षाहून अधिक काळ नागरिकांना २४ तास, ३६५ दिवस सहज उपलब्ध असणारा महापालिका आणि मतदार यांच्यामधील दूत ही त्यांची ओळख आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

उद्याच्या बदलत्या कोथरुडसाठी विचारांवर ठाम असलेला, पण स्वतःला अपडेट करीत कोथरुडला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारा, भविष्यातील समस्यांवर आजच तोडगा शोधणारा जनसेवक आहे. यालाच अनुसरून Vision कोथरूड + + समोर ठेवत शाश्वत कोथरूडच्या विकासाची ध्येयधोरणे मांडली आहेत….

  • कोथरूडचा Happiness Index करून नागरी जीवन भौतिक सुविधांबरोबर मानसिक समाधानाने समृद्ध होईल
  • Participatory Development Program, समितीद्वारे कोथरूडचा विकास आराखडा अंमलबजावणी.                              (शासकीय अधिकारी व मान्यवर नागरिक ह्यांची एकत्र कृती समिती)
  • १०,००० नागरिकांसाठी एक आठवडा बाजार सुरू (एक वस्ती-एक बाजार)
  • कोथरूड मधील eWaste मॅनेजमेंटसाठी प्रभावी यंत्रणा
  • BOT तत्वावर कोथरूड हा CCTV देखरेखीखाली अन् प्रत्येक घरात MNGL द्वारे पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा.
  • सोलरद्वारे वीजनिर्मिती प्रकल्प, सोसायट्यांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी समिती करणे.
  • पर्यावरण समतोल राखण्यास टेकड्यांवर वृक्षारोपण Quality of Life सुधारण्यास पर्यावरणप्रेमी कृती समिती.

लोकसंख्या घनतेत होणारी वाढ लक्षात घेऊन शाश्वत वाहतूक विकास

(वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरक्षित करण्यासाठी, सार्वजनिक वाहने व पादचाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी व्हिजन)

कोथरुड दळणवळण विषयक आगळावेगळा दृष्टीकोन देणारा आराखडा

रस्त्यांची पुनर्रचना

पौड रस्ता (४२ मीटर)                                  कर्वे रस्ता (४२ मीटर)

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

कर्वे पुतळा ते आशिष गार्डन (३५ मीटर).          डीपी रस्ता (३० मीटर)

मयूर कॉलनी रस्ता (२४ मीटर)                   भेलकेनगर ते आझाद चौक ते संगम चौक रस्ता (२१ मीटर)

• चौकांचा विकास 

१. आशिष गार्डन चौक         २. भेलकेनगर चौक

३. आझाद चौक                  ४. गीताई मॉल चौक

५. शिवाजी पुतळा चौक        ६. कोकण एक्स्प्रेस चौक

उड्डाणपुल / भूयारी मार्ग : १) करिष्मा सोसायटी चौक २) कर्वे पुतळा चौक ३) आयडीयल कॉलनी लिंक रोड

कर्वे पुतळा चौक ते आशिष गार्डन रस्ता

डीपी रोड ३६ मीटर. प्रचंड वाहतूक असलेला प्रमुख अंतर्गत रस्ता. झाडे, लेन मार्किंग, पार्किंग आणि पादचाऱ्यांसाठी आकर्षक पदपथ आवश्यक, सर्व सुविधा, विशेषतः एमएनजीएलची पाईपलाईन भूमिगत असेल. रस्त्यांवर योग्य असे दिशादर्शक, माहिती आणि पथदिवे असतील.

मयूर कॉलनी (डीपीरोड) राजाराम पथ

डीपी रोड २४ मीटर कमी वाहतूक असलेला प्रशस्त रस्ता प्रस्तावित ग्रीन कॉरिडॉर, हा पर्यावरणपूरक असा असेल. या ठिकाणी सौरउर्जेवर चालणारे दिवे, ऑक्सिजनचा पुरवठा करणारे झाडे, रेनवॉटर हार्वेस्टिंग वगैरे सुविधा असतील. नागरिकांना चालण्यासाठी अत्यंत आकर्षक असे रस्ते या ठिकाणी असतील, पौड फाट्याशी हा रस्ता जोडण्यात आल्यानंतर हा रस्ता कवें सत्ता आणि पौड रस्त्याला समांतर रस्ता म्हणून काम करेल.

भेलके नगर चौक ते संगम चौक, आझाद नगर चौक रस्ता

डीपी रोड २० मीटर. प्रचंड वाहतूक असलेला अरुंद रस्ता. सत्याच्या दोन्ही बाबूला मार्केट पादचारी आणि वाहनचालक यांच्यासाठी यासाठी फेररचना आवश्यक. चालता येण्याजोगे पदपथ आवश्यक.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

कुमार परिसर, स्व. श्रीकांत ठाकरे पथ

डीपी रोड ३० मीटर कमी वाहतूक असलेला प्रशस्त स्ता प्रस्तावित ग्रीन कॉरिडॉर, हा पर्यावरणपूरक असा असेल. या ठिकाणी सौरउर्जेवर चालणारे दिवे, ऑक्सिजनचा पुरवठा करणारे इण्डे, रेनवॉटर हार्वेस्टिंग वगैरे सुविधा असतील, नागरिकांना चालण्यासाठी अत्यंत आकर्षक असे रस्ते या ठिकाणी असतील. त्यांच्या विरंगुळ्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील,

करिष्मा सोसायटी चौकात (Split) उड्डाणपूल

 

– आयडियल कॉलनी चौक पौड फाट्याला जोडणारा भूमिगत सबवे

 

– कर्वे पुतळा चौकात वाय आकाराचा फ्लायओव्हरअर्बन वॉकिंग ट्रेल

अर्बन वॉल्कवे ट्रेल्स म्हणजे असे मार्ग जिथे सकाळी किंवा संध्याकाळी जास्तीत जास्त नागरिक चालण्यासाठी किंवा जॉगिंगसाठी जातात. अशा रस्त्यांना झाडांचे हिरवे आच्छादन असेल. आयडियल कॉलनीतील मैदानासारख्या मोकळ्या जागा, मैदाने किंवा उद्याने असतील. अशा रस्त्यांसाठी खास सुविधा निर्माण केल्या जातील. या ठिकाणी सौरउर्जेवर चालणारे दिवे, योग्य दिशादर्शक, सुरक्षिततेसाठी पोलिस चेकपोस्ट आणि कला सादरीकरण वगैरे गोष्टी विकसित करण्यात येतील. आतापर्यंत किती चालणे झाले आणि नेहमी हे अंतर चालण्यासाठी लागणारा कालावधी, अशी माहिती या ठिकाणी पुरविण्यात येईल.

उपलब्ध कटीबद्ध वचनबध्द!

पुण्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोथरुडच्या संस्कृतीला, परंपरेला आणि स्वभावाला साजेसा असा जनसेवक बनण्याचा प्रयत्न  शाम देशपांडे आतापर्यंत करीत आहेत. गेली २० वर्षाहून अधिक काळ नागरिकांना २४ तास, ३६५ दिवस सहज पणे उपलब्ध असणारा जनसेवक ही ओळख निर्माण केली आहे. महापालिका आणि मतदार यांच्यामधील केवळ दूत आहे, याची पूर्ण जाणीव कायम ठेवून उपलब्ध कटीबद्ध वचनबध्द नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.