मनसैनिकांचा कोथरूडला राडा! राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या थेट घरावर धडक, पोलिसांच्या ताब्यात

0
2

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये गोंधळ घातलाय. राज ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोथरूड येथील केदार सोमण नावाच्या व्यक्तीच्या घरी मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ घातला. पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य राडा टळला आहे. मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. यानंतर पोलिसांनी धाव घेतली आणि केदार सोमण यांना ताब्यात घेतले.

राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट

कोथरूड येथील राहणारा केदार सोमण यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी सोमण यांचा पत्ता शोधत आज सकाळी थेट त्यांच्या घरावर धडक दिली. सोमण यांच्या घरी मनसे कार्यकर्ते पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही, त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलीस कोथरूड येथील इंद्रधनु सोसायटीमध्ये पोहोचले.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

पोलिसांनी घेतले केदार सोमण यांना ताब्यात

पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या मुख्य द्वारापासून बाजूला केलं आणि रस्त्यावर घेऊन गेले आणि त्यानंतर केदार सोमण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, केदार सोमण याला घेऊन जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर धाव घेत मोठा गोंधळ घातला. केदार सोमण यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हटले की, रात्री हाफ खंबा मारून झाल्यावर राज कायम उद्धवला फोन करून म्हणायचा तू मेरा भाई है..(उठा रात्री पण घरीच बसून वाईन प्यायचा, घराबाहेर न पाडण्याचे व्रत, अखंड होते…)

मनसैनिकांनी घातला घराबाहेर मोठा गोंधळ

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार

ही केदार सोमण यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली आणि ज्यानंतर एकच गोंधळ उडावा. सोमण यांच्या घरी पोहोचलेल्या मनसैनिकांनी यावेळी शिवीगाळ देखील केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने सोमण यांनी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या गाडीवरही काही कार्यकर्त्ये धावून आले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल पोस्ट केल्याने केदार सोमण यांच्या घरी मनसे कार्यकर्त्ये पोहोचले होते.