आषाढी वारीत चंद्रभागेच्या तिरी वाळवंटात नसेल पाणी ‘उजनी’ चे सर्व दरवाजे बंद; भीमा नदी विसर्ग थांबला

0
12

पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी वारीचा सोहळा ६ जुलैला पंढरपुरात रंगणार आहे. त्यासाठी राज्यभरातून १३ ते १५ लाख भाविक पंढरपूरमध्ये असणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रभागेत वारकऱ्यांना स्नान करता यावे, वाळवंट परिसरात पाण्याचा विसर्ग जास्त राहू नये, यासाठी आता उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी पूर्णत: बंद करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) सकाळपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंट परिसरातील विसर्ग कमी होणार आहे.

उजनी धरण सध्या ७३ टक्क्यांपर्यंत भरले असून धरणावरील विद्युतनिर्मिती प्रकल्पासाठी सोडण्यात येणारे १६०० क्युसेक पाणी देखील बंद करण्यात आले आहे. ८ जुलैपर्यंत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाणार नाही, जेणेकरून आषाढी वारीचा सोहळा व्यवस्थित पार पडेल हा हेतू आहे. उजनी धरणात सध्या दौंड व स्थानिक परिसरातून १२ हजारांहून अधिक क्युसेकची आवक जमा होत आहे. पण, धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद केल्याने पुढील पाच दिवसांत धरण ९५ टक्क्यांपर्यंत भरेल, अशी स्थिती आहे. धरणात सध्या एकूण १०३ टीएमसी पाणी असून त्यात ३९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दरम्यान, वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग देखील आता बंद करण्यात आला आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!