महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांचेवतीने ७२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पुणे गट, पुणे विभाग कामगार कल्याण भवन , सहकारनगर १, पुणे येथे स्वरराज प्रस्तुत सूरनाद हा भक्तीभावगीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कामगार भूषण राजेंद्र वाघ, सर्व गुणवंत कामगार भाई ताम्हाणे, महादेव धर्मे, संजय गोळे, दिगंबर पोकळे,रविंद्र रायकर ,सोमनाथ वाले, सदाशिव एकसंबे , अनिल रामाणे ,संदीप रागोंळे, महादेव पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. लोकप्रिय कामगार नेते मा. शिवाजीराव खटकाळे यांच्या शुभहस्ते गटस्तरीय कामगार प्रबोधन दिंडी देहू ते आकुर्डी या पायीवारीत सहभागी झालेले गुणवंत कामगार आणि कुटुंबियांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी संपत खैरे, राजेश हजारे, सौ.रेणुका हजारे, महंमदशरीफ मुलाणी ,स्वानंद राजपाठक , शिवाजी पवार,बाळासाहेब सांळुके, रमेश डुंबरे सुनील हिंगे,शंकर नाणेकर,दत्तात्रय अवसरकर शिवदास शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गुणवंत कामगारांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
कार्यक्रमाचे उत्तम नियोजन कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक लेखाधिकारी उद्धव रामसने,अनिल कारळे, अविनाश राऊत, प्रदीप बोरसे,संदिप गावडे, अरुण वाडकर, संजय थोरात सर आणि सर्व महिलासदस्या यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकल्याण आयुक मनोज पाटील यांनी केले, सूत्र संचालन सुनिल बोरावडे यांनी केले.