पुणे महापालिकेच्या दीड वर्षांपासून रखडलेल्या अभियंता भरतीतील जागा वाढल्या; ११३ ऐवजी एवढ्या जागांना मंजुरी

0

गेल्या दीड वर्षांपासून रखडलेली पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदांची भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने या भरतीसाठी आता ११३ ऐवजी १७१ जागांना मंजुरी दिली आहे. या भरतीसाठी जानेवारी २०२४ मध्ये अर्ज केलेल्या २७ हजार ८७९ उमेदवारांचे अर्जही वैध धरले जाणार आहेत.

सुरवातीला महापालिकेने जानेवारी २०२४ मध्ये कनिष्ठ अभियंता पदांच्या ११३ जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, त्यावेळी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय उमेदवारांसाठी आरक्षणाची तरतूद न केल्यामुळे शासनाने ही प्रक्रिया थांबवून बिंदू नियमावली अद्ययावत करण्याचे निर्देश दिले होते.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

महापालिकेने त्यानुसार सुधारित नियमावलीनुसार नव्याने आरक्षण समाविष्ट करून जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी केली. मात्र, या प्रक्रियेत दीड वर्षाचा विलंब झाला आणि अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांचे भवितव्य अधांतरी राहिले होते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यावर विभागाने नव्याने १७१ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करावी आणि आधी अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज कायम ठेवावेत, असा स्पष्ट अभिप्राय दिला आहे.

‘एज बार’चा धोका नाही

नगरविकास विभागाच्या आदेशानुसार, जानेवारी २०२४ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या जातीचा प्रवर्ग सुधारणेची संधी दिली जाणार आहे. तसेच, दीड वर्षाच्या कालावधीत वयोमर्यादा पार केलेल्या उमेदवारांनाही नव्या जाहिरातीत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे जुने अर्जदार देखील या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार आहेत.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार