WhatsApp सतत नवीन फीचर्स आणत असतो. युजर्सच्या प्रायव्हसीसाठी कंपनीने अनेक सिक्युरिटी फीचर्स दिले आहेत. या फीचर्सचा वापर करून आपण आपली वैयक्तिक माहिती लपवू शकतो. तसेच, आपले ऑनलाइन स्टेटस, प्रोफाइल फोटो आणि लास्ट सीन यासाठी वेगवेगळ्या सेटिंग्ज निवडता येतात.
WhatsApp मोबाईलसोबतच लॅपटॉप आणि संगणकावरही वापरता येतो. लॅपटॉपवर WhatsApp Web द्वारे आपण चॅट करू शकतो. सध्या अनेक कार्यालयांमध्ये WhatsApp चा वापर कामासाठी वाढला आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये WhatsApp Web उघडावे लागते. पण यामुळे बाजूला बसलेले लोक तुमचे मेसेज वाचण्याची शक्यता असते. यापासून वाचायचं असेल, तर एक सोपी ट्रिक आहे – आणि ती खूप उपयोगी ठरू शकते.
कोणीही वाचू शकणार नाही तुमचे WhatsApp वरील मेसेज !
ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताना अनेकदा भीती असते की कोणीतरी तुमच्या स्क्रीनवर पाहून मेसेज वाचत असेल. पण तुम्ही ही काळजी दूर करू शकता – आणि त्यासाठी कोणताही App डाउनलोड करण्याची गरज नाही.
जर तुम्ही Google Chrome ब्राउझरवर WhatsApp Web वापरत असाल, तर एक Chrome Extension वापरून तुम्ही मेसेज लपवू शकता.
कोणते Chrome Extension डाउनलोड करावे लागेल?
तुम्ही फक्त 3 स्टेप्समध्ये हे एक्सटेंशन डाउनलोड करू शकता:
- Google Chrome उघडून सर्च करा – Privacy Extension for WhatsApp Web
- मिळालेल्या पेजवर उजव्या बाजूला “Add to Chrome” हे बटण दिसेल, त्यावर क्लिक करा.
- पुढे येणाऱ्या Pop-up मध्ये “Add Extension” वर क्लिक करा. हे Extension आता तुमच्या Chrome मध्ये अॅड होईल.
Extension कसे वापरायचे?
- Chrome च्या उजव्या कोपऱ्यात Extension चा icon दिसेल – त्यावर क्लिक करा.
- त्यात Privacy Extension for WhatsApp Web वर क्लिक करा.
आता तुम्हाला विविध गोष्टी लपवण्यासाठी Toggle Options दिसतील:
- प्रोफाइल फोटो
- नाव
- शेवटचा मेसेज
- चॅट विंडोचा मजकूर
- QR कोड वगैरे
जे लपवायचे असेल ते Toggle ON करा. यामुळे WhatsApp Web मध्ये ते भाग Blur (अस्पष्ट) होतील.
फायदे:
- ऑफिसमध्ये सुरक्षितपणे WhatsApp वापरता येईल.
- स्क्रीनवरील मेसेज कोणीही वाचू शकणार नाही.
- कोणतेही अॅप इंस्टॉल करावी लागणार नाही.