गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अपघातात मृत्यू; पत्नी आणि मुलीची भेट… राहिली अपूर्ण

0
12

एअर इंडियाच्या एका भीषण विमानअपघातातगुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले. लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या मुलीच्या भेटीसाठी ते निघाले. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अहमदाबाद विमानतळावरून निघाले, पण अहमदाबादमध्येच त्यांच्या आयुष्याची एका भीषण अपघातात अखेर झाली. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजय रुपाणी यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती दिली.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले. गुरुवारी (१२ जून) दुपारी लंडनच्या दिशेने झेपावलेल्या या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही होते. तब्बल २४२ जण असलेले हे विमान अहमदाबादमधील मेघानी नगरमध्येच कोसळले.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

केंद्रीय मंत्री आणि गुजरात भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी विजय रुपाणी यांचे अपघातात निधन झाल्याची माहिती दिली.

“आमचे नेते, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे याच विमानातून त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते. पण, त्यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने भाजपच्या कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. हा अपघात इतका मोठा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुजरातमध्ये येत आहेत. जे जे शक्य असेल, ते इथे येऊन करतील”, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

विजय रुपाणींची पत्नीही मुलीच्या घरी

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची मुलगी लंडनमध्ये राहते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी अंजली रुपाणी या लंडनमध्ये मुलीकडे गेल्या. त्यानंतर गुरूवारी (१२ जून) विजय रुपाणीही त्यांच्या भेटीसाठी लंडनला निघाले होते.

२०४ जणांचा मृत्यू

एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत २०४ जणांचा मृत्यू झाला आहे. विमान खाली कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. यामुळे विमानातील बहुतांश प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.