फडणवीस-शिंदे-अजितदादा केमिस्ट्रीला मतभेदांची नजर? ‘संवादा’चा मुद्दा आत्ताच का काढला ? राजकारण तापलं ‘ही’ आहेत मोठी कारणं

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवत पुन्हा एकदा महायुतीनं सत्ता काबीज केली. खरंतर विरोधी पक्षनेता मिळवण्याइतपत संख्याबळही न मिळाल्यामुळे महाविकास आघाडी एकदमच बॅकफूटला गेली.तर महायुती विनाअडथळा सुसाट विकासाच्या मार्गावर धावेल अशी महाराष्ट्राच्या भोळ्याभाबड्या जनतेला अपेक्षा होती. पण अवघ्या सहाच महिन्यांत महायुतीत वारंवार या ना त्या कारणांनी कधीच्या वादाच्या ठिणग्या तर कधी रुसव्या फुगव्यांनी मतभेद चव्हाट्यावर आणले. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाचाही संवाद चांगला नसल्याचं रोखठोक विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

महायुती सरकारमध्ये एकमेकांवर टीका वा कुरघोडीची एकही संधी भाजपसह अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना सोडताना दिसून येत नाही. हे प्रकरण नुसतं महाराष्ट्र किंवा मुंबईपुरतंच मर्यादित न राहता थेट दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या कानापर्यंत जाऊन धडकलं. विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस-शिंदे-अजितदादांची केमिस्ट्रीला सध्या मतभेदांची नजर लागल्याचे दिसून आलं आहे.

विधानसभा निवडणुकीआधी जपून आणि सावध पावलं टाकणार्‍या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपनं निकालात मिळालेल्या 132 जागांमुळे महायुतीत दबावतंत्राचं राजकारण सुरू केलं आहे. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय चाणक्य अमित शाहांनी महाराष्ट्रात महायुती म्हणूनच पुढं जायचं असं ठणकावलं असलं तरी इथलं राजकारण तितकंसं सोपं नाही, हे महाराष्ट्राचं राजकारण कोळून प्यालेल्या फडणवीसांना याची चांगलीच जाणीव आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्हीही नेते वेगवेगळ्या विचारधारा आणि कार्यशैलीच्या राजकीय पक्षातून पुढे आलेले नेते आहेत. त्यामुळे निश्चितच या दोन्हीही नेत्यांची काम करण्याची पध्दतीही वेगळीच आहे. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कार्यशैली आहे.ते प्रचंड अभ्यासू,संयमी,विचारपूर्वक आणि तार्किकदृष्ट्या सगळ्या कसोट्यांवर तावून सुलाखून भाजपच्या मुशीत तयार झालेलं राजकीय व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्यांचा राजकारणासह प्रशासनावरची पकड मजबूत आहे. पण अशावेळी त्यांनी शिंदे आणि अजितदादांबद्दलची खटकणारी भावना जाहीररित्या मुलाखतीत बोलून दाखवली या पाठीमागं निश्चितच काही राजकीय आराखडे असू शकतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंबाबत संवाद चांगला नसल्याचं वक्तव्य हे त्यांनी शिंदे जे महायुतीच्या अगोदरच्या टर्ममध्ये प्रचंड अॅक्टिव्ह होऊन काम करत होते. ती कार्यपध्दतीची झलक आता फडणवीसांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये आजतागायत दिसून आलेली नाही. फडणवीसांमुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदाच्या संधी हुकल्याचं शल्य किंवा डिमांड केलेल्या गृहखातंही भाजपनं न सोडलेल्या शिंदेंनी सरकार राहून अलिप्त राहण्याची भूमिका घेतल्याचं लपून राहिलेलं नाही.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

शिंदेंनी सरकारच्या किंवा फडणवीसांनी बोलावलेल्या महत्वाच्या बैठकांना मारलेल्या दांड्यांनी हे सिध्द केलं होतं. त्यामुळे शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारमधील विसंवादाची पुनरावृत्ती टाळून सरकारमध्ये कार्यरत राहावं, अशी भावना फडणवीसांची असू शकतात. पण मूळत: फडणवीसांना शिवसेनेतील नेतेमंडळींच्या वादग्रस्त विधानं आणि विविध कारनाम्यांमुळे महायुती सरकारचा बचाव करताना दमछाक होते,ते टाळण्यासाठी शिंदेंनी या डोकेदुखी ठरणार्‍या नेत्यांना शिस्तीचा मार्ग दाखवणं अपेक्षित असावं.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांच्या कामाच्या झपाट्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांसह कुणालाही तिळमात्र शंका नाही. पण ते आपल्या भाषणातून किंवा माध्यमांशी संवाद साधताना काय बोलतील याचा नेम नाही. कधी ते बोलता बोलता विरोधी पक्षांसह मित्रपक्षांच्या नेत्यांबाबतही अडचणीत आणणारी विधानं करुन मोकळे होतात. त्याचे दूरगामी परिणाम सरकारवर होताना दिसून येतो.

तसेच बऱ्याचदा त्यांचा संवादाऐवजी एकतंत्री कारभार हाकण्याकडे कल असतो.तो महायुती म्हणून काम करताना अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. तसेच अजितदादांच्या या कार्यपध्दतीमुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमजही निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे फडणवीसांनी त्यांच्या संवादाबाबतची भूमिका जाहीररित्या बोलून दाखवली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महायुती म्हणून पाच वर्षे सरकार चालवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची साथ मिळणंं तितकंच गरजेचं आहे. दोन्ही नेत्यांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचं कसब फडणवीसांना दाखवावं लागणार आहे. स्थानिकच्या निवडणुकांना सामोरे जाण्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी एकही नेता संवादासाठी चांगला नसल्याचं जाहीररित्या सांगत उणीवेवर बोट ठेवले असण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

चारभिंतीच्या आत ही बाब कानावर घालून झाल्यानंतरही परिणाम समोर न आल्यामुळेही कदाचित पुन्हा एकदा फडणवीसांनी ही बाब उघडपणे मांडली असावी. याचवेळी फडणवीसांनी आपल्या वक्तव्याचं दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांना वाईट वाटणार नाही असंही म्हटलं होतं.

‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोण चांगला संवाद साधतो असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘दोन्हीही नेते संवाद साधण्यात चांगले नाहीत, असं सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. इतकंच नाहीतर फडणवीसांनी पुढे मला आशा आहे की, मी व्यक्त केलेल्या माझ्या मताबाबत त्यांना वाईट वाटणार नाही आणि ते मला माफ करतील, असंही म्हटलं होतं. यानंतरही महायुतीतलं राजकारण तापलं आहे.