उद्योजक लड्डा यांच्या घरी दरोडा प्रकरणी संभाजीनगरमध्ये अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालून…

0
2

छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक लड्डा यांच्या घरावरीला दरोडा प्रकरणी मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला. रात्री वडगाव कोल्हाटी परिसरामध्ये पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाल्यानंतर एन्काऊंटर केल्याची माहिती मिळाली. सोमवारी रात्री आरोपी अमोल खोतकर पकडण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांच्या अंगावर गाडी घालून पोलिसांनाच मारण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी एन्काऊंटर केला. दरम्यान, दोन आठवड्यापूर्वी छत्रपती संभाजी नगर शहरातील वाळूज परिसरामध्ये उद्योजक लड्डा यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आला जवळपास साडेसहा किलो सोनं चांदी आणि रोख रक्कम लुटली होती.

बीड अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचं पोलिसांनी मध्यरात्री एन्काऊंटर केलं. साडेबारा-एकच्या सुमारास खोतकरने पोलिसांवर गाडी घालून गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी त्याचं एन्काऊंटर केलं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांकडून अधिक माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचं समजतंय.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर पडलेला सुमारे ६ कोटींच्या दरोड्याचा उलगडा झाला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यातील पाच जणांना ताब्यात घेतले होते.मात्र, दरोड्याचा मुख्य सूत्रधार पसार होता. त्याला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी प्रचंड गुप्तता बाळगली होती. काल रात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांना सापडल्यानंतर तो पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पळून जात होता अशा वेळेस एन्काऊंटर केले असल्याची माहिती आहे.

उद्योजक लड्डा हे मुलाच्या पदवी प्रदान समारंभासाठी ७ मे रोजी कुटुंबीयांसह अमेरिकेला गेले होते. १९ वर्षांपासूनचा विश्वासू कामगार संजय झळके (रा. वळदगाव) याला केअरटेकर म्हणून बंगल्यावर ठेवले होते. १५ मे रोजी पहाटे २ ते ४ यादरम्यान ६ दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर बंगल्यातून साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी असा सुमारे ६ कोटी रुपयांचा ऐवज लुटला होता. एवढ्या मोठ्या दरोड्याची राज्यभर चर्चा होती. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यावर तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्याकडे वर्ग केला होता. ११ दिवसांपासून गुन्हे शाखेचे ७ आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील २ अशी ९ पथके तपास करीत होती.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे