बेंगळुरू : बेंगळुरूमधून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजप आमदार एन. मुनिरत्ना यांच्यावर सामुहिक अत्याचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एका ४० वर्षीय महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला आहे. त्या महिलेला बेंगळुरूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एन. मुनिरत्ना यांच्याशिवाय महिलेने इतर चौघांनाही सहआरोपी केलं आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.






एका महिलेने आमदार मुनिरत्ना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१३ मध्ये तिच्यावर मुनिरत्ना यांनी वेशावृत्तीचा आरोप केला होता. वैयक्तिक दुश्मनीतून त्यांनी मला तुरुंगात पाठवलं, असा आरोप महिलेने केला आहे. आमदारांनी तिला खोट्या गुन्ह्यात अडकवलं, असं तिचं म्हणणं आहे. जेलमधून सुटल्यानंतर आमदाराने पुन्हा तिला त्रास दिला, असा दावा महिलेने केला. त्यांच्या माणसांनी तिच्यावर खुनाचा आरोप लावला. त्यामुळे तिला पुन्हा तुरुंगात जावं लागलं. मात्र, एका महिन्यातच तिला जामीन मिळाला आणि ती बाहेर आली.
महिलेने तक्रार केली, की जर ती त्याच्यासोबत मुनिरत्न याच्या कार्यालयात गेली, तर तिच्यावरील प्रलंबित खटले मागे घेतले जातील. आरोपीने तिला फसवून आमदाराच्या कार्यालयात नेण्याचा प्रयत्न केला. यांच्या ऑफिसमध्ये माझ्यासोबत लैंगिक शोषण झालं, असे तिने तक्रारीत म्हटलं आहे.
एफआयआरमध्ये असं लिहिलं की, आमदाराने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आरोपीकडून तिच्यावर बलात्कार केला. नंतर, मुनिरत्न यांनी तिच्या चेहऱ्यावर लघवी केली. त्यानंतर तिच्या शरीरात एक पदार्थ, इंजेक्शन टाकलं आणि त्यामुळे ती आयुष्यभर पीडित राहील असंही तिला सांगितलं. पोलिसांनी हे प्रकरण एफआयआरमध्ये नोंदवलं आहे. एफआयआरमध्ये असंही म्हटलं आहे की आमदाराने तिला घटनेबद्दल कोणालाही सांगण्यास मनाई केली आणि नंतर सहकाऱ्यांना तिला घरी परत सोडण्याचे निर्देश दिले.
महिलेवर उपचार सुरू
१४ जानेवारी २०२५ रोजी महिलेला पोटात दुखायला लागलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केली. रक्ताच्या तपासणीनंतर तिला एक व्हायरल झाल्याचं समजलं. डॉक्टरांनी सांगितलं की तिला एक गंभीर आजार झाला आहे. FIR मध्ये नोंद आहे की, मेडिकल तपासणीत तिला असा आजार झाल्याचं समजलं, ज्यावर उपचार नाही. पीडित महिलेला खूप त्रास होत होता. तिला असह्य वेदना होत होत्या. त्यामुळे तिने १९ मे च्या रात्री झोपायच्या गोळ्या खाल्ल्या. तिच्या शेजारच्या व्यक्तीने तिला बघितलं आणि तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यामुळे तिचा जीव वाचला.
सिने दिग्दर्शक ते राजकीय नेते
मुनिरत्न नायडू हे कर्नाटकात सिने दिग्दर्शक होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात एन्ट्री केली. २०१३, २०१८, २०२० आणि २०२४ मध्ये राजराजेश्वरी नगरमधून आमदार म्हणून निवडले गेले. मार्च २०१८ मध्ये, सीआयडीने इतर अधिकाऱ्यांसह मुनिरत्न यांच्याविरुद्ध १५०० कोटी रुपयांचं फेक बिल बनवून पेमेंट मिळल्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केलं होतं.











