यूट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. पाकिस्तानची हेर गद्दार ज्योती मल्होत्रा हिने चारवेळा मुंबई दौरा केल्याचं उघड झालं आहे. यूट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्या गद्दारीचे एकेक पुरावे रोज समोर येत आहेत. पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्रा हिनी अखेर आयएसआयशी संबंधांची दिली कबुली दिली आहे. याचदरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्योती मल्होत्राने चारवेळा मुंबई दौरा केल्याचं समोर आलं आहे.






पाकिस्तानची हेर गद्दार ज्योती मल्होत्रा हिने चारवेळा मुंबई दौरा केल्याचं उघड झालं आहे. ज्योती मल्होत्राचा मुंबई दौरा आता तपास यंत्रणांच्या स्कॅनरवर आला आहे. ज्योती मल्होत्राने 2024 मध्ये तीनवेळा तर 2023 मध्ये एकदा मुंबईवारी केली. मुंबईत अनेक भागात तिने फोटो, व्हिडीओ काढले. 2023 मध्ये लालबागचा राजा, तिथली गर्दी, याचा व्हिडीओ तिने काढला. हे व्हिडीओ, फोटो तिने कोणाला पाठवले याचा तपास सुरू आहे. मुंबईतल्या अनेक भागांचे फोटो काढून तिने ते नंतर डिलीट केलेत. ते विशेष डिव्हाईसे पुन्हा रिकव्हर करण्यात आलेत.
ज्योती मल्होत्राची अखेर कबुली-
पाकिस्तानात अली हसनने आयएसआय अधिकाऱ्यांशी भेट घालून दिली होती. पाकिस्तानातच आयएसआय एजंट शाकीर, राणा शाहबाजचीही भेट घेतली होती. शाकीरचा 923176250069 हा नंबर ‘जट रधाँवा’ नावे केला सेव्ह होता. शाकीरशी वारंवार चॅटमधून देशाविरोधातली माहिती दिल्याची कबुली गद्दार ज्योती मल्होत्राने दिली आहे. तसेच दानिशच्या मदतीने केल्या पाकिस्तानच्या दोन फेऱ्या मारल्याचं देखील ज्योती मल्होत्राने म्हटलं आहे. मी व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे सतत सर्वांशी संपर्कात राहिली आणि देशविरोधी माहितीची देवाणघेवाण करू लागली. मी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात अधिकारी दानिशला अनेक वेळा भेटली, अशी हादरवणारी माहिती ज्योती मल्होत्राने दिली आहे.
कोण आहे ज्योती मल्होत्रा?
युट्यूबर ज्योती मल्होत्रा ही सामान्य घरातील मुलगी आहे. आलिशान आणि लक्झरी आयुष्य जगण्याच्या हव्यासामुळे ती देशविरोधी कारवायांमध्ये सामील झाल्याचे सांगितले जात आहे. वडिलांसोबत एका छोट्या घरात राहणाऱ्या ज्योतीला पैसे कमावण्याची इतकी घाई होती की उच्च माध्यमिक शिक्षण झाल्यावर तिने त्वरित नोकरी शोधण्यास सुरुवात केली होती. सुमारे 14 वर्षांपूर्वी तिने एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून पहिली नोकरी स्वीकारली होती.रिसेप्शनिस्टची नोकरी सोडल्यानंतर ज्योती मल्होत्रा हिसारपासून 20 किलोमीटर दूर असलेल्या एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागली. मात्र, तिने तिथेही फार काळ काम केले नाही आणि नंतर हिसारमधील एका कॉलेजजवळ असलेल्या मार्केटमध्ये एका खाजगी कार्यालयात पुन्हा रिसेप्शनिस्ट म्हणून काम सुरू केले. सतत नवीन नोकऱ्या शोधणे आणि जुन्या सोडणे यातच तिचं आयुष्य पुढे सरकत गेलं. पण तिला तिच्या स्वप्नांप्रमाणे जीवन जगता येत नव्हतं.











