दहावीचा निकाल उद्या दुपारी; कुठे आणि कधी पाहता येणार?

0
11

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा निकालही जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल १३ मे रोजी निकाल दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. बोर्डाची पत्रकार परिषद मंगळवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. त्यानंतर ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जारी होतील. बोर्डाकडून पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल, मुलींचे आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, जिल्हानिहाय उत्तीर्ण आकडेवारी सांगितली जाईल.

दहावीचा निकाल १२ मे रोजी जाहीर करण्याचं निश्चित केलं होतं. मात्र सोमवारी बुद्ध पौर्णिमेची सार्वजनिक सुट्टी असल्यानं सोमवार ऐवजी मंगळवारी १३ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निकाल लवकर जाहीर होणार असल्यानं पुनर्परीक्षार्थींची लवकर परीक्षा होईल.

अधिक वाचा  कोथरूड सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समिती; 17वा विसर्जन नियोजन महोत्सव…तोच उत्साह …तोच ध्यास!

कुठे आणि किती वाजता बघता येणार निकाल?

बोर्डाकडून तीन अधिकृत संकेतस्थळांवर निकाल जाहीर केला जाणार आहे. mahresult.nic.in, results.gov.in, DigiLocker यावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. निकालाबाबत सविस्तर माहिती बोर्डाकडून मंगळवारी ११ वाजता पत्रकार परिषदेत दिली जाणार आहे.