हल्ला होण्यापूर्वी नेमका सायरन कधी वाजतो?; जीव वाचण्यास किती वेळ? सायरनचं कामं नेमकं कसं असतं?

0

सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ७ मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले होते. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना शत्रू देशाच्या हल्ल्यापासून कसा स्वत:चा बचाव करायचा याचं प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी काही सायरन देखील वाजवण्यात आले. सायरन वाजल्यावर किंवा ज्यावेळी युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळी सायरन वाजल्यास काय करावे? याचे प्रशिक्षण देण्यात आले.

नुकत्याच झालेल्या मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन देखील वाजवण्यात आला. हा सायरन वाजवण्याचा उद्देश म्हणजे नागरिकांना हवाई हल्ल्यासारख्या परिस्थितीत आपला जीव कसा वाचवायचा हे शिकवणं असा होता. मात्र तुम्हाला माहितीये का, मिसाईल अॅटक, एअर स्ट्राईक होण्यापूर्वी कधी वाजवला जातो सायरन? आणि स्वतःला जीव वाचण्यासाठी किती मिळतो वेळ? चला जाणून घ्या…

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

हल्ला होण्यापूर्वी कधी वाजतो सायरन?

समजा जेव्हा हवाई हल्ल्याचा धोका निर्माण होतो तेव्हा नागरिकांना सतर्क आणि सुरक्षिततेचा इशारा दिला जातो. यासाठी एक महत्त्वाची यंत्रणा सज्ज असते, ती म्हणजे एअर रेड सायरन. एअर रेड सायरनचा आवाज एका विशिष्ट प्रकारचा असतो. हा सायरन जेव्हा वाजवला जातो तेव्हा मिसाईल अॅटक, एअर स्ट्राईकचा धोका असतो. कधीकधी नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही हा सायरन वाजवला जातो. हल्ला होण्यापूर्वी साधारण हा सायरन ६० सेकंदापर्यंत वाजतो. या सायरनचा अर्थ असा की लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेण्याची गरज आहे. आजही विमानतळांवर आणि हवाई दलात हवाई हल्ल्याचे सायरन वाजत असल्याचे ऐकायला मिळते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

सायरनचं कामं नेमकं कसं असतं?

हल्ला करताना ज्यावेळी शत्रूच्या बाजूने कोणतेही रॉकेट, लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्र आपल्या देशाच्या हवाई क्षेत्रात एन्ट्री करतात तेव्हा हवाई दलाचे रडार लगेच ते पकडते आणि यावरून आपल्याला शत्रूबद्दल माहिती मिळते. शत्रू देशाने डागलेल्या क्षेपणास्त्राची दिशा आणि त्याचा वेग लक्षात घेऊन हल्ल्याच्या संभाव्य भागात रेड अलर्ट जारी केला जातो. यामुळे, हल्ल्याच्या संभाव्य ठिकाणी काही वेळ आधीच सायरन वाजवला जातो आणि लोकांना फक्त एक मिनिटभर स्वतःला जीव वाचण्यासाठी वेळ मिळतो.